शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

By admin | Updated: December 22, 2014 05:02 IST

हाजुरी दर्गा नूरी रोड येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली होती.

ठाणे : हाजुरी दर्गा नूरी रोड येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी हुसेन शेख (१७) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा आणखी एक साथीदार मात्र पसार झाला आहे.पीडित तरुणी मैत्रिणीसह खासगी क्लासला जात होती. त्यावेळी हाजुरीतील सबूर (१७) आणि हुसेन या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. ते या विद्यार्थिनींशी वाईट हेतूने बोलण्याचा प्रयत्न करत होते. हुसेन याने सबूरला तिचा हात पकडण्यासाठी चिथावणी दिली. त्यामुळे सबूरने शिवीगाळ करीत तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार १६ ते १९ डिसेंबर दरम्यान वारंवार सुरू होता. पुढे कहर म्हणजे २० डिसेंबर रोजी सबूरने, ‘मेरेसे बात नहीं करेगी तो मैं तेरे मुंहपे अ‍ॅसिड डालकर तुझे जलाउँगा,’ अशी धमकी तिला दिली. हा प्रकार लुईसवाडीतील पारसिक बँकेजवळ घडला. विद्यार्थीनीने वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. विनयभंगाचा, लैंगिक अपराधाचा गुन्हा दोघांविरोधात दाखल केला आहे. यातील हुसेनला अटक करण्यात आली आहे. त्याची ठाणे न्यायालयाने भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गवते या तपास करीत आहेत.