शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदची प्रॉपर्टी घेऊ इच्छिणाऱ्या पत्रकाराला धमकी

By admin | Updated: December 7, 2015 01:48 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेच्या जाहीर लिलावामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तेच्या जाहीर लिलावामध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करणारे ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुख्यात गुंड छोटा शकिलकडून बोलत असल्याचे धमकी देणाऱ्याने सांगितल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, येत्या बुधवारी दाऊदच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर फरार असलेल्या ‘मोस्ट वॉण्टेड’ दाऊदच्या मुंबई व देशभरातील मालमत्ता शासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत. त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करूनही दहशतीमुळे कोणी खरेदी करण्यास पुढे येत नाही. त्याचप्रमाणे अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याने आणि डी गँगचे हस्तक नातेवाईकांच्या माध्यमातून ही मालमत्ता विकत घेण्याचा प्रयत्न करीत असल्याने, बरीच वर्षे ती पडून राहिलेली आहे. आता दक्षिण मुंबईतील पाखमोडिया स्ट्रीटजवळील दाऊद इब्राहिमच्या नावे असलेले दिल्ली जायका हे हॉटेल, तसेच घाटकोपर व माटुंगा येथील मालमत्ता विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली जायका हॉटेलचा जाहीर लिलाव येत्या बुुधवारी केला जाणार आहे. त्यासाठी किमान ३० लाखांपासून बोलीला सुरुवात केली जाणार आहे. साधारणपणे सव्वा कोटीपर्यंत त्याचा दर मिळावा, असे शासनाचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार एस. बालाकृष्णन यांनी या लिलावामध्ये सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानंतर शुक्रवारी त्यांना छोटा शकिलच्या गुंडाकडून धमकी देणारा फोन आला. ‘लिलावात भाग घेतल्यास तुझा गेम करतो,’ असे धमकाविण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्याला यापूर्वीही डी गँगकडून त्यांना धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्त घेतल्यानंतर, सर्वसामान्य व सहजतेने वावरता येत नसल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण पोलीस बंदोबस्त घेणार नाही. त्याचप्रमाणे, लिलावातून माघारही घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही प्रॉपर्टी आपल्याला मिळाल्यास, त्याचा वापर सामाजिक कार्यासाठी विशेषत: गरीब मुले आणि महिलांच्या मदतीसाठी करण्याची प्रयत्न करू, असे बालाकृष्णन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)