शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याची 'इसिस'ची धमकी

By admin | Updated: August 7, 2016 16:08 IST

शहरातील प्रमुख रेल्वे स्थानके बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली

फहीम देशमुख/ऑनलाइन लोकमत बुलढाणा, दि. 7- शेगाव येथील गजानन महाराज मंदिर आणि शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरांसह शहरातील प्रमुख रेल्वे स्थानके बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शेगाव येथील मंदिरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शेगाव रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात येत आहे.इसिस संघटनेने जळगाव जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिल्या आहेत.  'इसिस' या दहशतवादी संघटनेने शेगाव येथील मंदिर उडवून देण्याच्या धमकीसंदर्भातील अलर्ट येथे शनिवारी शेगावपर्यंत पोहोचला नव्हता. मात्र रविवारी सकाळपासून शेगावला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज रविवारी मंदिरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह दंगा काबूपथक, श्वानपथकाने मंदिर व परिसराचा आढावा घेतला.रेल्वे स्थानकांची कसून तपासणी सरू करण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे. शस्त्रसज्ज पोलीस गणवेशात आणि नजरबाज पोलीस खासगी वेशात तैनात करण्यात आले आहेत. भुसावळअंतर्गत असलेल्या मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे सुरक्षा बलाच्या बॉम्बशोधक, नाशक पथकाकडून शनिवारी सायंकाळी अमरावती रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. इसिसने पाठविलेल्या धमकीपत्रात खामगाव येथील काही कार्यकर्ते याकामी नेमले असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने त्या दृष्टीनेही गोपनीय विभाग सतर्क झालेला असून, काही संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे.