शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

धाग्याने विणली बंधुत्वाची गुंफन, ५ हजार भावांची बनल्या 'ताई'

By admin | Updated: August 21, 2016 17:34 IST

धावपळीच्या या युगात आप्तेष्टांचाही विसर पडत असल्याने कुटुंबातही दुरावा निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत.

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २१ : धावपळीच्या या युगात आप्तेष्टांचाही विसर पडत असल्याने कुटुंबातही दुरावा निर्माण होत असल्याची उदाहरणे आहेत. मात्र अशा परिस्थितीत काहीजण मात्र याला अपवाद ठरत दृढ निश्चयाने निर्माण झालेले नाते घट्ट विणत आहेत याचे उदाहरण म्हणजे खामगाव तालुक्यातील आडवळणाच्या पोरज गावातील गोदावरीताई ढोण  होत. यामुळेच आज ५ हजार भावांच्या ताई होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

खामगाव तालुक्यातील पोरज हे आडवळणाचे सुमारे ५०० ते ७०० लोकवस्तीचे गाव. या गावातील गोदावरीताई बोराडे  आई-वडिलांना एकुलत्या. त्यांचे लग्न येथील पुरुषोत्तम ढोण यांच्याशी झाले. लग्नानंतर वृध्द आई-वडिलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाल्याने गोदावरीताई व त्यांच्या पतीने गोदावरीतार्इंच्या माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला. भाऊ म्हणजे एका आईचीच दोन लेकरे ही विचारसरणी झुगारत आपलेपणाने गोदावरीतार्इंनी गावातील प्रत्येकासोबतच भावाचे नाते जपले. यामुळे रक्षाबंधनदिनी त्या गावातील सुमारे ५० जणांना राखी बांधत. या सामाजिक कार्यातूनच त्या सन २००० मध्ये कृउबास संचालक तसेच खरेदी-विक्री संस्थेवर संचालक म्हणून निवडून आल्या. यामुळे तालुक्यात त्यांचा परिचय वाढल्याने बंधुत्वाचे नाते सुध्दा वाढले.

यामुळे बाहेरगावी राखी बांधण्यासाठी जावू शकत नसल्या तरी त्यांनी नियमितपणे राखी पाठविणे सुरु ठेवले आहे. या बंधुत्वाच्या नात्यामुळे आजरोजी त्यांनी सुमारे ५ हजार भावांना राखीच्या बंधनातून जोडले आहे. सन २००० मध्ये सुमारे ५०० भावांना त्या राखी पाठवित असत आज हा आकडा सुमारे ५ हजार पर्यंत पोहोचला आहे. या राखी वाटप कामी त्यांना पती पुरुषोत्तम ढोण, मुलगा उमेश व गणेश तसेच इतर नातेवाईकांचे सुध्दा सहकार्य मिळते. गेल्या तेरा वर्षापासून सातत्याने हा राखी पाठविण्याचा उपक्रम राबवित आहेत.