शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धागेदोरे थेट महसूल विभागापर्यंत!

By admin | Updated: May 15, 2016 05:23 IST

महसूल मंत्रालयात अडलेले जमिनीच्या मंजुरीचे एक प्रकरण मंजूर करवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचे समोर आले आहे.

यदु जोशी,  मुंबईमहसूल मंत्रालयात अडलेले जमिनीच्या मंजुरीचे एक प्रकरण मंजूर करवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचे समोर आले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे ओएसडी उन्मेश महाजन यांचे नाव तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी अटक झालेला गजानन उर्फ गजमल लक्ष्मण पाटील याच्याविरुद्ध आठ महिन्यांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तेव्हापासूनची त्याची मोबाइल संभाषणे आणि इतर हालचालींवर नजर ठेवली जात होती. पाटील हा वारंवार लाचेची मागणी करीत असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्याला मंत्रालयाच्या गेटवर पंचांसमक्ष शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविणारे डॉ. रमेश केशव जाधव (वय ७०) हे उच्चशिक्षित (पीएचडी) आहेत. देशविदेशात खासगी क्षेत्रात महत्त्वाच्या पदांवर काम करून ते सेवानिवृत्त झाले. त्यांची इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स इन प्रोजेक्टस् मॅनेजमेंट अँड रिसर्च ही सामाजिक संस्था आहे. त्यांच्या मित्रांनी १९९५ मध्ये ती स्थापन केली होती. या संस्थेचे शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी त्यांनी आधी ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील मौजे निळजे येथील जमीन मागितली होती. ती गायरानाची असल्याचे सांगून त्यांना आघाडी सरकारच्या काळात नकार देण्यात आला होता. डॉ. जाधव यांनी शनिवारी त्यांच्या अंधेरीतील निवासस्थानी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘आमच्या संस्थेला याच तालुक्यातील नांदीवली येथील जमीन देण्याची लेखी तयारी शासनाने दर्शविली होती. अर्थात, रेडीरेकनरनुसार या जमिनीच्या किमतीपोटी ५ कोटी ७० लाख रुपये भरण्याची तयारी संस्थेने दर्शविली होती. ७७ लाख ४० हजार रुपये इतकी रक्कम संस्थेने शासनाकडे भरलीदेखील होती. महसूलमंत्र्यांकडून या जमिनीची अंतिम मान्यता मिळविण्यासाठी पाटील आपल्याकडे पैशांची मागणी करायचा.’ ‘सदर जमीन मिळावी, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री खडसे यांची भेट घेतली होती,’ असे त्यांनी सांगितले. ‘खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना, ज्या जमिनीचा हा विषय आहे, त्याबद्दल २०१४ मध्येच निर्णय देण्यात आला होता. आता हे मुद्दाम केले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करायला हवी. गजानन पाटीलला मी ओळखतो. तो मतदारसंघातला आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली. >२०११ मध्ये झाली होती याच प्रकरणी अटकडॉ. जाधव यांच्या संस्थेने मौजे निळजे (ता. कल्याण, जि.ठाणे) येथील ३७ एकर जमिनीची मागणी शासनाकडे केली होती. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ६ कोटी रुपयांची लाच मागितली, म्हणून जाधव यांच्या तक्रारीवरून २०११ मध्ये निळजेचे तत्कालीन सरपंच, चार ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकास अटक करण्यात आली होती.काय म्हणायचा पाटील?‘जमीन मिळण्यासाठी पाठपुरावा म्हणून मी महसूलमंत्री खडसे यांच्या कार्यालयात जात होतो. तेव्हा गेल्या वर्षी मंत्र्यांचे ओएसडी उन्मेश महाजन यांची भेट घ्यायचो. तेथे गजानन पाटीलची पहिल्यांदा भेट झाली. त्याने काम करवून देण्यासाठी लाच मागितली,’ असे डॉ. जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे. ‘तुम्हाला आॅर्डरच द्यायची आहे ना देतो, १५ सीआर (कोटी) लागतील. आता आणून ठेवाल, तिथे रामटेकवर कसे काय करायचे ते सांगतो. हा आकडा उन्मेशने सांगितला. तुम्हाला द्यायला वेळ लागेल ना,’ अशी पाटीलची वाक्येही तक्रारीत नमूद आहेत. १५ कोटींचा आकडा नंतर त्याने ३० कोटींवर नेला.पाटीलचा मुक्त वावर : गजानन उर्फ गजमल पाटील हा मुक्ताईनगर तालुक्यातील मेळ सांगवे येथील रहिवासी असून, तो कट्टर खडसे समर्थक मानला जातो. गेली काही वर्षे तो आमदार निवासातच बरेचदा राहायचा. खडसे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात त्याचा मुक्त वावर असे. तक्रारकर्ते जाधव आणि त्याच्या मंत्रालयात गाठीभेटी झाल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. लोकायुक्तांकडे तक्रारगजानन पाटीलविरुद्ध डॉ. जाधव यांनी राज्याचे लोकायुक्त एम. एल. टहेलयानी यांच्याकडे तक्रार केली आहे. पाटीलच्या संभाषणाच्या टेप्स् सादर करण्याचे आदेश टहेलयानी यांनी दिले आहेत.दोन दिवसांची कोठडीगजानन उर्फ गजमल पाटीलला शनिवारी मुंबईतील सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याची अधिक चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी एसीबीने केली होती.