शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

आधारवाडीच्या निविदेला अखेर मिळाला प्रतिसाद

By admin | Updated: November 3, 2016 03:55 IST

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका मागवत असलेल्या निविदेला दहाव्या वेळी प्रतिसाद मिळाला

मुरलीधर भवार,

कल्याण- आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका मागवत असलेल्या निविदेला दहाव्या वेळी प्रतिसाद मिळाला आहे. सौराष्ट्र एनव्हेरा असे या कंपनीचे नाव असून ती गुजरातची आहे. त्यांनी ३० कोटींची निविदा भरली आहे. त्यावर चर्चा करुन प्रशासन निर्णय घेणार आहे. या डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने ते शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयााने दीड वर्षापूर्वीच दिले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालिकेने न्यायालयात सांगितले आहे. त्यासाठी गेल्या वर्षभरात पालिकेने दहा वेळा निविदा मागवली. त्यासाठी आता सौराष्ट्र एनव्हेरा कंपनीने रस दाखवला आहे. हे डम्पिंग बंद केल्यावर बारावे भरावभूमी विकसित करावी लागणार आहे. त्यासाठी १० कोटी ७१ लाखांची निविदा पालिकेला मिळाली आहे. हा भांडवली खर्च आहे. देखभाल दुरुस्तीसाठी आणखी पाच कोटी ३१ लाखांची निविदा आली आहे. या तिन्ही निविदांवर पालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे. उंबर्डे येथे ३५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागवली आहे. ती १० डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. बारावे येथे २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येईल. >कचरा प्रश्न हरित लवादाकडे २००९ सालापासून उच्च न्यायालयात घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात सुरु असलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ग केली आहे. या सुनावणीची तारीख अद्याप मिळालेली नाही. लवादाने यापूर्वी कारखान्यातून होणाऱ्या रासायनिक सांडपाण्याच्या प्रदूषणावरून स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना १०० कोटीचा दंड ठोठावला आहे, तर घनकचरा प्रकल्प राबवण्यात दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाने बांधकामबंदी केली होती.