शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

अन् पर्यटकांचा उडाला थरकाप

By admin | Updated: October 29, 2014 00:39 IST

बोर अभयारण्याला नुकताच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला़ यामुळे संरक्षित जंगल कायदाही आपोआप लागू झाला. या कायद्यानुसार पर्यटकांना जंगल सफारी करताना वाहनातून खाली उतरता येत नाही,

बोर व्याघ्र प्रकल्पातील घटना : जंगल सफारीचे वाहन पडले बंद; तासभर प्रवासी धोक्यातप्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा)बोर अभयारण्याला नुकताच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा प्राप्त झाला़ यामुळे संरक्षित जंगल कायदाही आपोआप लागू झाला. या कायद्यानुसार पर्यटकांना जंगल सफारी करताना वाहनातून खाली उतरता येत नाही, हा दंडनीय अपराध असतो; पण येथे या कायद्याची दुसऱ्यांदा पायमल्ली झाली़ आहे. जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचे एक वाहन जंगलात धोक्याच्या स्थळी अचानक बंद पडले़ सुमारे तासभर जीव धोक्यात घालून जंगलात उभे राहण्याची वेळ आल्याने पर्यटकांचा थरकाप उडाला होता़पर्यटक जंगलात उभे असताना सुदैवाने कोणताही हिंस्र प्राणी तेथे आला नाही. एक तासानंतर पर्यायी वाहनाची व्यवस्था करून पर्यटकांना पुन्हा नियम पायददळी तुडवूनच पुढील सफारीला पाठविण्यात आले़ हा प्रकार २५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांनी परवानाधारक जिप्सी भाडेतत्वावर घेतली. आठ जणांची क्षमता असताना जिप्सी क्र. एम़एच़ ०१ टी़ ३८७८ च्या चालकाने मुला-बाळांसह १०-११ प्रवासी जिप्सीत कोंबून जंगल सफारीला सुरूवात केली. घनदाट जंगलात ऐन धोक्याच्या स्थळी वाहनात तांत्रिक बिघाड आल्याने ते बंद पडले़ प्रवाशांच्या काळजाचे ठोके चुकले. याच मार्गाने मागाहून येणाऱ्या दोन जिप्सी तेथे थबकल्या. जिप्सीखाली उतरण्याची परवानगी नसताना पर्यटक खाली उतरले. सोबतच्या गाईडनेही त्यांना थांबवले नाही. तासाभरानंतर सफारीवर असलेले एक वाहन बोलविण्यात आले़ ते वाहनही पर्यटकांनी भरलेले होते़ बंद जिप्सीतील सर्व पर्यटक त्यात कोंबले़ अक्षरश: एकमेकांच्या अंगा-खांद्यावर बसून पर्यटकांनी सुमोतून पुढील सफारी पूर्ण केली. व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता सफारीची वाहने वाढविणे गरजेचे आहे.