शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो अनुदानित तुकड्या बंद होणार?

By admin | Updated: July 7, 2015 02:20 IST

संच मान्यतेतील जाचक अटींमुळे राज्यातील ६० हजार अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील हजारो तुकड्या बंद होण्याची भीती मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे.

मुंबई : संच मान्यतेतील जाचक अटींमुळे राज्यातील ६० हजार अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील हजारो तुकड्या बंद होण्याची भीती मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने आॅनलाइन संच मान्यतेतील त्रुटी दूर करून तातडीने पूर्वीप्रमाणे प्रचलित निकषांनुसार संच मान्यता करण्याची मागणी केली आहे.प्रचलित पद्धतीने एप्रिल २०१५पर्यंत संच मान्यता देण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचा दावा संघटनेचे सरचिटणीस अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार सदोष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आॅनलाइन संच मान्यता करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील ९ ते १० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अतिरिक्त ठरवले जातील. शिवाय नवीन निकषांमुळे राज्यातील हजारो अनुदानित तुकड्या बंद होण्याची भीतीही देशमुख यांनी व्यक्त केली आहे.याआधी संघटनेने मार्च २०१५मध्ये पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संघटनेसोबत बैठक घेऊन काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात एप्रिल २०१५मधील संच मान्यतेच्या मागणीसह २००३ ते २०११पर्यंतच्या एक हजार शिक्षकांची वाढीव पदे मंजूर केली होती. मात्र या दोन्ही आश्वासनांपैकी कोणतेही आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी पूर्ण केलेले नसल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे सदोष सॉफ्टवेअर पद्धतीने संच मान्यता करू नये आणि मंजूर पदांवरील एक हजार शिक्षकांना तत्काळ वेतन देण्याची मागणी संघटनेने केली आहे. सरकारने मागणी मान्य केली नाही, तर लवकरच राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक असहकार आंदोलन पुकारतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यासाठी ९ जुलैला मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक संघटनेतर्फे इशारा आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक कार्यालयांबाहेर आंदोलन करून इतर शिक्षक पाठिंबा देतील. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळ या शैक्षणिक संस्था चालकांच्या संघटनेचे राज्य अध्यक्ष विजय पाटील यांनीही शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अनुदान कपातीसाठी तुकड्या बंद करणाऱ्या सरकारविरोधात संस्था चालक गप्प बसणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)