शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विद्यार्थिनीवर चोरट्याचा बलात्कार

By admin | Updated: February 27, 2016 04:52 IST

महाविद्यालयाच्या जिममध्ये व्यायाम केल्यानंतर हनुमान टेकडीवर जाऊन पुस्तक वाचत बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक

पुणे : महाविद्यालयाच्या जिममध्ये व्यायाम केल्यानंतर हनुमान टेकडीवर जाऊन पुस्तक वाचत बसलेल्या महाविद्यालयीन तरुणीला धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी ७च्या सुमारास घडली. बलात्कारानंतर आरोपीने तिची पर्स हिसकावून नेली. चतु:श्रुंगी पोलिसांनी गुरुवारी रात्री १२च्या सुमारास गुन्हा दाखल करून विजय विकास कांबळे (२१) या सेनापती बापट रस्तावरील वडारवाडीत राहणाऱ्या युवकाला अटक केली.या प्रकरणी १९वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. ती मूळची पश्चिम बंगालची असून, जुलै २0१५पासून सेनापती बापट रस्त्यावरच्या एका प्रख्यात महाविद्यालयामध्ये बीएस्सीच्या (अर्थशास्त्र) प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. तिचे वडील एका राष्ट्रीय बँकेत रोखपाल आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे टेकडीवर गेली होती. पॅगोडाजवळ बसून पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्या वेळी अचानक पाठीमागून आलेल्या कांबळेने तिचे तोंड दाबून धरून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने मराठी-हिंदीमध्ये पैसा-पैसा असे बडबडत तिची पर्स हिसकावून घेतली. पॅगोडापासून १५ फुटांपर्यंत तिला लांब नेऊन बलात्कार केला. मदतीसाठी कोणीच दिसत नव्हते. त्यामुळे त्याने पुन्हा तिला जवळच्या उतारावर नेऊन कपडे काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कोणीतरी येत असल्याची चाहुल लागताच आरोपी कांबळे तेथून पसार झाला. पीडित मुलीने तेथे आलेल्या दोन माणसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर त्यांनी आरोपीचा शोध घेतला मात्र तो मिळाला नाही. घाबरलेली तरुणी तिच्या खोलीवर गेली. मैत्रिणीच्या मोबाइलवरून तिने वडिलांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार देण्यास सांगितले. परंतु घाबरल्यामुळे ती पोलिसांकडे गेली नाही. गुरुवारी सकाळी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. सराईत गुन्हेगारगुरुवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीच्या शोधाला तत्काळ सुरुवात केली. आरोपी कांबळेवर डेक्कन पोलीस ठाण्यात हनुमान टेकडीवर फिरायला येणाऱ्यांना लुटण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला सहा महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने अटक केली होती. त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली.