शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा लाखचोर पोलीस उपनिरीक्षक जाधवला ५० हजारांची लाच घेतांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 21:05 IST

नाशिक : न्यायालयात दाखल करण्यात येणा-या पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांना शुक्रवारी (दि़१७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मावसभावाने ...

ठळक मुद्दे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकपुरवणी दोषारोपपत्र दाखल करताना आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी

नाशिक : न्यायालयात दाखल करण्यात येणा-या पुरवणी दोषारोपपत्रात आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांना शुक्रवारी (दि़१७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मावसभावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात ७३ / २०१७ अन्वये गुन्हा दाखल असून त्यामध्ये तक्रारदार हे साक्षीदार आहेत़ न्यायालयात या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून पुरवणी दोषारोपपत्र दाखल करताना तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी तपासी अंमलदार तथा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निवांत जगजितसिंह जाधव यांनी तक्रारदाराकडे गुरुवारी (दि़१६) ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर शुक्रवारी (दि़१७) उपनगर परिसरातील टाकळीरोड येथे सापळा लावण्यात आला होता़ त्यानुसार उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़