शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी, लक्षाधीशांमध्ये गरीब उमेदवारही

By admin | Updated: February 15, 2017 20:09 IST

महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक लढविणारे बहुतांश उमेदवार लखपती तर बरेच कोट्यधीश आहेत.

सातपूर : महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक लढविणारे बहुतांश उमेदवार लखपती तर बरेच कोट्यधीश आहेत. यातील बऱ्याच उमेदवारांवर वित्तीय संस्थांचे कर्ज आहे. या उमेदवारांनी स्वत: प्रतिज्ञापत्राद्वारे संपत्ती घोषित केली आहे. असे असले तरी काही उमेदवार अगदीच गरीबदेखील आहेत. गेले दहा वर्षे नगरसेवक पद भूषिवणारे दिनकर पाटील हे कोट्यधीश आहेत. सुमारे २ लाख रुपये रोख, २२ लाख रु पयांच्या ठेवी, जवळपास ३७ लाखांची मोटार, दीड लाख रुपयांचे दागिने असे ६३ लाख ७६ हजार रुपये, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाख ७८ हजार रु पये, जंगम मालमत्ता ७७ लाख ५० हजार रु पये, स्थावर मालमत्ता ८४ लाख ४९ हजार रुपये, अशी ९ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता आणि ८ कोटी ४५ लाख रु पयांचा जमीनजुमला आहे. दिनकर पाटील यांच्यावर सुमारे साडेनऊ लाखांचे कर्जदेखील आहे. प्रभाग क्र मांक ८ मधून निवडणूक लढविणारे दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल पाटील हेदेखील लक्षाधीश आहेत. त्यांच्याकडे सुमारे सव्वा लाख रु पये रोख, १७ हजार रु पयांच्या ठेवी, ३३ हजार रु पयांचे बंधपत्र, सुमारे १६ लाख रुपयांची मोटार, ३ लाख रुपये किमतीचे दागिने, सुमारे २२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता, ३५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर साडेपाच लाख रु पये वित्तीय संस्थेचे कर्ज आहे. प्रभाग क्र . ९ मधून प्रेम दशरथ पाटील यांच्याकडे १ लाख ४३ हजार रुपये रोख, २७ लाख ३५ हजार रु पयांच्या ठेवी, तर ३ लाख ७८ हजार रु पयांचे दागदागिने आणि सुमारे ३५ लाखांची मोटार गाडी, तसेच त्यांच्या कुटुंबाकडे ४७ लाख ५५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता व सुमारे ५४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यांच्या नावावर वित्तीय संस्थेचे साडेसात लाख रुपयांचे कर्ज आहे. प्रभाग क्र मांक ११ मधून निवडणूक लढविणारे नगरसेवक सलीम शेख यांच्याकडे रोख दीड लाख रुपये आहेत. सुमारे साडेतीन लाख रु पयांच्या ठेवी, दीड लाख रु पयांची प्रमाणपत्रे, सुमारे २५ लाखांची मोटार गाडी, ९ कोटी ९० लाख ५० हजार रु पये किमतीचा जमीनजुमला असून, त्यांच्यावर ५५ लाख रुपयांचे कर्जदेखील आहे. प्रभाग क्र मांक १० मधून निवडणूक लढविणाऱ्या डॉ. वृषाली सोनवणे यांच्याकडे ३ लाख ७८ हजार रु पये रोख, २ लाख रु पयांच्या ठेवी, ५ लाख रुपयांचे दागदागिने आहेत