शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

हजार रुपयांची औषधे गेली लाखाच्या घरात !

By admin | Updated: October 9, 2014 04:57 IST

तुम्हाला कॅन्सर, क्षय, मधुमेह किंवा हृदयरोगासारखे क्लेशकारक आजार असतील, तर त्यावरील नियमित औषधपाण्याकरिता आता घसघशीत रक्कम मोजण्याची तयारी

मुंबई : तुम्हाला कॅन्सर, क्षय, मधुमेह किंवा हृदयरोगासारखे क्लेशकारक आजार असतील, तर त्यावरील नियमित औषधपाण्याकरिता आता घसघशीत रक्कम मोजण्याची तयारी ठेवा! आजवर दीडशे रुपये ते साडेआठ हजार रुपयांच्या घरात असलेल्या औषधांच्या किमती आता थेट ३९९ रुपये ते एक लाख आठ हजार रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. या दरवाढीला केंद्र सरकारचा अजब फतवा निमित्त ठरला आहे!उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधानांच्या अमेरिकी दौऱ्याच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने देशातील औषधांच्या किमतीचे नियंत्रण आणि धोरण निश्चित करणाऱ्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग आॅथोरिटी’ला वर नमूद केलेल्या रोगांबाबत उपलब्ध असलेल्या औषधांबाबत लागू असलेली मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्याचे आदेश दिले़ तसेच या रोगांवरील औषधांना ‘जीवनावश्यक’ श्रेणीतूनही वगळण्याचे आदेश दिले. एकूण १०८ औषधांच्या किमतींना ‘जीवनावश्यक’ श्रेणीतून वगळल्याने या सर्वच औषधांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे. सरकारच्या आदेशानुसार ही मार्गदर्शक तत्त्वे रद्द केल्यामुळे कॅन्सर, क्षय, मधुमेह, हृदयरोग अशा सर्वच रोगांवरील औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. उदाहरणाने सांगायचे झाल्यास कॅन्सरकरिता प्रभावी औषध समजल्या जाणाऱ्या ग्लेव्हिक या औषधाची किंमत आजवर साडेआठ हजार रुपये होती़ ती आता थेट एक लाख आठ हजार रुपये झाली आहे. तर रक्तदाब आणि हृदयरोगाच्या रुग्णांना नियमित सेवनासाठी देण्यात येणाऱ्या प्लविक्स या औषधाची किंमत १४७ रुपयांवरून थेट १,६१५ रुपयांवर गेली आहे. तर अ‍ॅन्टी रेबिजकरिता देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची किंमत २,६७० रुपयांवरून सात हजार रुपये इतकी झाली आहे. ज्या औषधांच्या किमती नियंत्रणातून मुक्त झाल्या आहेत, त्यापैकी बहुतांश कंपन्यांची मुख्यालये ही अमेरिकेत असल्याने आणि या कंपन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक असल्यानेच त्यांच्या दौऱ्यापूर्वी ही मार्गदर्शक तत्त्वे रद्द करीत तेथील कंपन्यांना ‘रेड कार्पेट ट्रीटमेंट’ दिल्याचे टीकास्त्र माजी रसायन मंत्री श्रीकांत जेना यांनी सोडले आहे. (प्रतिनिधी)