शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

हजारावर मजुरांनी सोडले गाव!

By admin | Updated: April 20, 2016 05:50 IST

कळंब तालुक्यातील शिराढोण या १६ हजार वस्तीच्या गावात जनावरांच्या चारा-पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गावात रोहयोची केवळ सहा कामे सुरू असून

राहुल ओमने, शिराढोण (जि. उस्मानाबाद)कळंब तालुक्यातील शिराढोण या १६ हजार वस्तीच्या गावात जनावरांच्या चारा-पाण्यासह रोजगाराचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गावात रोहयोची केवळ सहा कामे सुरू असून, त्यावर १८० मजूर काम करीत आहेत. त्यामुळे येथील जवळपास ६०० तर लमाणतांडा वस्तीवरील ४०० मजुरांनी गाव सोडले आहे. त्यात युवकांचे प्रमाण अधिक आहे.मोठी बाजारपेठ असण्याबरोबरच जिल्ह्यात सर्वात मोठा तब्बल ५ हजार २०० हेक्टरचा शिवारही याच गावाचा आहे. गावात सुमारे तीन हजार शेतमालक आहेत. सोयाबीन हे नगदी पीक येथे केले जाते. तीन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. एकरभर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास २० हजारांचा खर्च येतो, परंतु चाळीस गुंठ्यात पन्नास ते साठ किलोचा उतारा आल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाही. जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. येथील सुमारे दोन हजार जनावरांना दररोज १३ हजार ५९६ किलो चाऱ्याची आवश्यकता आहे. दरवर्षी सोयाबीन, भुस्कट व ज्वारीचा उपलब्ध होणारा कडबा यंदा खरीप व रबी हंगामही हातचा गेल्याने मिळाला नाही. चाऱ्याचा प्रश्न बिकट झाल्यानंतरही परिसरातील १५ गावांत एकही चारा छावणी सुरू झाली नाही. त्यामुळे पशुपालक जनावरे बेभाव विकत आहेत. रोहयोची १९२ रुपये प्रमाणे मिळणारी मजुरीही काही ठिकाणी मिळत नसल्याची तक्रार आहे.तीन एकर शेतीवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका चालते. तीन वर्षांपासून शेतीचा खर्चही न निघाल्याने आता भाजीपाला व्यवसाय सुरू केला. रोजचा खर्च भागविण्याएवढे उत्पन्न आता मिळत आहे. - मधुकर देशमुख, शेतकरीगतवर्षी सोयाबीनची दुबार पेरणी करूनही खर्च वाया गेला. पाणी नसल्याने बागायती पिके घेतली नाहीत. कुठे मजुरीचे कामही मिळत नाही. त्यामुळे कुटुंबाला दोन वेळचे खायला घालणेही मुश्कील होत आहे.- राजाभाऊ व्होनमाने, शेतकरी