शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

हजार फूट खोल दरीत पडलेल्या चौघांना वाचविले

By admin | Updated: December 29, 2015 12:51 IST

पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावर कार चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातानंतर महाबळेश्‍वर येथील धाडसी हायकर्सच्या तरुणांनी रात्रंदिवस शोधमोहिमेनंतर २४ तासांनंतर चार जणांना दरीबाहेर काढले.

 

 

 

पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावर कार अपघात : २४ तासांनंतर हायकर्सच्या मदतीने काढले बाहेर महाड : पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील घाटात भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे ३ वा. पोलादपूरपासून १५ कि.मी. अंतरावर दाभोळ गावच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त कुटुंब हे मूळचे कर्नाटक राज्यातील बेंगलोरचे रहिवासी असून, ते पर्यटनासाठी आले होते. मुंबईहून महाबळेश्‍वरकडे जात असताना त्यांची कार दरीत कोसळली. महाबळेश्‍वर येथील धाडसी हायकर्सच्या तरुणांनी रात्रंदिवस शोधमोहिमेनंतर २४ तासांनंतर दोन मृतदेह आणि चार जणांना दरीबाहेर काढण्यात यश मिळवले.  खन्नाबेरम वेणुगोपालस्वामी (७0) आणि जमुना खन्नाबेरम असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या दाम्पत्याचे नाव असून, अरविंद खन्नाबेरम (३५), सुनील महेंद्र (३२) चालक, अनुपमा खन्नाबेरम (३२) व अर्पिता विजय (१४, सर्व रा. यशवंतपुरम् मेट्रो स्टेशन, बेंगलोर) हे चौघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींवर महाडच्या डॉ. रानडे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चार दिवसांपूर्वी बेंगलोरहून निघालेले हे कुटुंब दोन दिवस मुंबईत होते. त्यानंतर महाबळेश्‍वरला जाण्यासाठी ते निघाले. वाटेत महाडला थांबण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, लॉज फुल्ल असल्याने त्यांनी शनिवारी रात्रीच महाबळेश्‍वरला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र वाटेत त्यांच्यावर काळाने झडप घातली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथे कडाक्याची थंडी, गर्द झाडी व काळोख असल्याने काय करावे तेच त्यांना समजत नव्हते. अरविंद यांनी मोबाइलवरून बेंगलोरच्या एका मित्राला कार महाबळेश्‍वरजवळ घाटात दरीत कोसळली असल्याचा मेसेज पाठवला. रविवारी सकाळी हा मेसेज मिळाल्यानंतर त्यांनी महाबळेश्‍वर पोलिसांशी संपर्क साधला. महाबळेश्‍वर पोलिसांनी हायकर्सच्या मदतीने महाबळेश्‍वर मार्गावरील सर्व घाटांमध्ये शोधमोहीम सुरू केली. मात्र नेमकी दुर्घटना कुठे घडली, त्या ठिकाणचा तपास दिवसभर लागू शकला नाही. पोलादपूर पोलिसांनीही सर्व मार्गांवरील घाटामध्ये शोधमोहीम सुरू ठेवली. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे हे जीपने महाबळेश्‍वर मार्गाने शोधकामासाठी जात असताना गाडीच्या सायरनचा आवाज अपघातग्रस्तांना आला. त्याचवेळी अपघातस्थळाच्या जवळपास शोधमोहीम करणार्‍या महाबळेश्‍वर येथील हायकर्सच्या तरुणांची गाडी त्यांना भेटली. त्या आवाजांचा वेध घेत त्या ठिकाणी हायकर्सचे तरुण दरीत उतरले व त्यांनी अपघातग्रस्तांना शोधून काढले. आज सोमवारी सकाळी ६ वाजता दोन मृतांसह चार जखमींना बाहेर काढण्यात हायकर्स व पोलिसांना अखेर यश आले. या दाम्पत्याचे मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.  महाबळेश्‍वर येथील अनिल केळगणे, अनिल शिंदे, नीलेश बावळेकर, ओम्कार, सविनकर, सुनील मझिया, नीलेश आडे, संदीप जांभळे, निशांत शिंदे, जयवंत तिरमळे, अनिकेत नाकदरे, कृष्णा बावळेकर या धाडसी तरुणांनी २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही शोधमोहीम यशस्वी केली.