शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार कोटींनी घटला महाराष्ट्राचा मुद्रांक शुल्क महसूल!

By admin | Updated: February 17, 2017 03:29 IST

महाराष्ट्र सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारा महसूल एक हजार कोटींनी घटला आहे. जानेवारी २०१७ पर्यंतची ही आकडेवारी

मुंबई : महाराष्ट्र सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारा महसूल एक हजार कोटींनी घटला आहे. जानेवारी २०१७ पर्यंतची ही आकडेवारी असून, गतवर्षीच्या तुलनेत ही घट झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. जानेवारी २०१६ पर्यंत नोंदणी महानिरीक्षकांकडे मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १७,२४४ कोटी रुपये जमा झाले होते. या वर्षीचा महसूल १६,२५४ कोटी रुपयांचा आहे, अशी माहिती महानिरीक्षक आणि नियंत्रक एम. रामस्वामी यांनी दिली. नोटाबंदीनंतर संपत्तीच्या खरेदी विक्रीत मंदी दिसून येत आहे. संपत्तीच्या नोंदणी व मुद्रांक शुल्कातून सरकारला दररोज ६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, ते उत्पन्न आता ४२ कोटी रुपयांवर आले आहे. विकासाच्या हक्काचे हस्तांतरण (टीडीआर) प्रकरणात सरकारला १५०० कोटी रुपये येणे आहेत. त्याची वसुली सुरू केल्यास महसूलातील हा तोटा भरून येऊ शकेल, असेही रामस्वामी यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘गौण खनिजाच्या बाबतीतही अशीच मोठी रक्कम प्रलंबित आहे. त्याबाबतही सरकारला कळविले आहे. मुद्रांक शुल्क व त्यासंबंधीचे व्यवहार डिजिटल होत आहेत. तरीही सद्या सरकारला यातून मिळणारा महसूल कमीच आहे.’ (वाणिज्य प्रतिनिधी)नोटाबंदी फटकानोटाबंदीचा फटका अनेक लहान-मोठ्या उद्योगांना बसल्याचे सांगितले जात आहे. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयालाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे याची झळ बसली आहे. कारण नोटाबंदीनंतर खरेदी विक्रीचे व्यवहार मंदावले. त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून या विभागाला मिळणारा महसूल कमी झाला. जमिनी असो की, फ्लॅट यांच्या व्यवहाराला मर्यादा आल्या असून, सरकारचा महसूल त्यामुळे घटला आहे. नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने २०१५-२०१६ या वर्षात २१,७६७ कोटी रुपयांचा महसूल दिला आहे.