शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

पतसंस्थांची कोटींची उलाढाल थंडावली!

By admin | Updated: November 18, 2016 18:47 IST

चलनबंदीचा परिणाम; बुलडाणा जिल्ह्यातील हजारो पतसंस्थेमध्ये आर्थिक मंदी.

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा, दि. १८- पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्याने जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५६0 पतसंस्थांवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील हजारो पतसंस्थांवर आर्थिक मंदिचे सावट निर्माण झाले असून, जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांची मिळून कोटींची उलाढाल थंडावली असल्याने पतसंस्थेतील ठेवीदारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.जिल्ह्यात सहकारी पतसंस्था जवळपास १ हजार ५६0 आहेत. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २५४, चिखली तालुक्यात २२३, देऊळगाव राजा ७४, सिंदखेडराजा ६६, लोणार ६0, मेहकर १४२, खामगाव १६0, शेगाव ११२, संग्रामपूर ४४, नांदुरा ११६, जळगाव जामोद ६१, मलकापूर ११९, मोताळा तालुक्यात १२९ पतसंस्था आहेत. जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेत दररोज लाखो रुपयांचा भरणा होतो. यामध्ये दैनंदिन बचत ठेवीचे पैसे अधिक आहेत. तसेच शेतकरी, व्यावसायीक यांची मदार पतसंस्थेवरच आहे. परंतू चलनातून पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने, तसेच अशा नोटा घेण्यास पतसंस्थांनी नकार दिल्याने आता दररोज केवळ लाखो रुपयांऐवजी केवळ हजारो रुपयेच पतसंस्थेत जमा होत आहेत. चलनातून पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने पतसंस्थेची आर्थिक उलाढाल थंडावली आहे. मजूर, विक्रेते, शेतकर्‍यांची बचत, ठेव खाती, पतसंस्थेत आहेत. त्यांचे पैसे जमा होत नाहीत. आता कर्जवसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सहकारी पतसंस्थांमध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आहे. पतसंस्थांवर पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्विकारणे बंद केल्याने पैशांच्या तुटवडा निर्माण झाला आहे. नोटा बंद केल्यानेत्यामुळे पतसंस्थेतील गुंतवणूक भरणा यावर मोठा परिणाम झाला असून, पतसंस्थेवर आर्थिक मंदिचे सावट निर्माण झाले आहे. पतसंस्थांचे लाखोंचे व्यवहार हजारावर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंदचा जिल्ह्यातील हजारो पतसंस्थांना फटका बसला आहे. पतसंस्थामध्ये १00 किंवा ५0 रूपयांच्या नोटा घेऊन येणार्‍या लोकांचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. मात्र, ५00 किंवा एक हजार रूपयांच्या नोटा पतसंस्था स्वीकारत नसल्याने पतसंस्थांचे लाखोंचे व्यवहार हजारावर येवून ठेपले आहेत. सोनेतारण व्यवहाराला मोठा फटकापाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदीचा सोनेतारण व्यवहाराला मोठा फटका बसला आहे. पतसंस्थांमध्ये लाखो रूपयांचे सोनेतारण कर्ज दिले जाते; परंतू सध्या मोठ्या रक्कमेअभावी ही कर्ज प्रकरणे बंद झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांकडे अद्याप नव्या चलनातील मोठी रक्कम आली नसल्याने पतसंस्थामध्ये पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पतसंस्थेतील सोनेतारण व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच पतसंस्थाना नागरिकांना २ हजार रुपये देणेही अवघड झाले असल्याने पतसंस्थेची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. -जिल्ह्यातील सर्व पतसंस्था मिळून कोटींची उलाढाल होते. परंतू अचानक पाचशे व एक हजारच्या नोटा बंद केल्याने पतसंस्थानी स्टेट बँक व अर्बन बँकेत सर्व पैसा जमा केला. त्यामुळे पंतसंस्था सर्वसामान्यांना २ हजार रुपये सुद्धा देवू शकत नाही. यामुळे गरीबांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, पतसंस्थांना त्यांचे पैसे १00 व २ हजार रुपये चलनात परत केल्यास अर्थववस्था सुरळीत होईल. श्याम उमाळकर, अध्यक्ष, सत्यजीत अर्बन सोसायटी, मेहकर.