शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मीटर रीडिंग न घेता हजारोंचे बिल

By admin | Updated: March 4, 2017 03:20 IST

डहाणू तालुक्यातील कासा भागात महावितरणाचा सावळा गोंधळ सुरू

शशिकांत ठाकूर,कासा- डहाणू तालुक्यातील कासा भागात महावितरणाचा सावळा गोंधळ सुरू असून वेळोवेळी मीटर रिडींग न घेता अंदाजे ग्राहकांना भरमसाठ घरगुती वीज देयकांद्वारे (बील) आकारणी के ली जात आहे.तालुक्यातील पेठ येथील नम्रता ठाकूर यांना घरगुती मीटरचे जानेवारी महिन्याचे वीज बील ३१,२०० रू आले आहे. दर महिन्यास त्यांना सरासरी २५० रू. इतके वीज बील येत असतांना डिसेंबरमध्ये त्यांना सरासरी वीज वापर ३० ते ३२ युनिट दाखविण्यात आला असतांना डिसेंबर महिन्यात एकदम २९३३ युनिट वीज वापर दाखवून बील आकारले आहे. तसेच जानेवारी २०१७ या एक महिन्याचा विजवापर ७३३ युनिट दखवून फेब्रुवारीत त्यांना १७,७,३० रू इतके बिल आले आहे. पेठ येथील जयेंद्र ठाकूर या दुसऱ्या ग्राहकास जानेवारी एका महिन्याचे घरगुती मीटर वापराचे वीजबिल २४,५३० रू. इतके आले आहे. त्यांना दर महिन्यास सरासरी ३०० रू इतके बिल येते. तसेच जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर पर्यंतच्या वीजवापर युनिट सरासरी ३४ ते ३६ दाखविण्यात आला असतांना डिसेंबरचा विजवापर २२९३ युनिट दाखविण्यात आला आहे. उर्से येथील रामचंद्र पाटील यांना फेब्रुवारीत २,६६० रू बील आले आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०१६ ते आॅगस्ट पर्यंत त्यांचा वीजवापर सरासरी ४० युनिट असतांना सप्टेंबरमध्ये १६९८ युनिट आॅक्टोबर-५९२ युनिट, नोव्हेंबर २१० युनिट, डिसेंबर ३३९ युनिट असा विसंगत दाखविण्यात आले आहे. डहाणूत अशी होते लूटडहाणू आदिवासी व ग्रामीण भागात बऱ्याच ग्रहाकांना अशी वेळोवेळी प्रत्यक्ष रिडींग न घेता अंदाजे बिले पाठवून वर्षभरातून कधीतरी एकदाच मीटर रिडींग घेऊन भरमसाठ देयके धाडण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे अशी देयके एकदम कशी भरावी शेतकरी व ग्राहकांकडून प्रश्न केला जात आहे. तसेच वेळोवेळी दर महिन्यास खेडयापाडयात वीज बील येत नसून अंतिम तारखेनंतर पोहचत असल्याने ग्राहकांना अधिक विलंब आकार शुल्क भरावे लागते मात्र तरीही संबंधित ठेकेदार कंपनीवर महावितरणाकडून कोणतीही कारवाई होत नाही.>रीडिंग न घेता महावितरणकडून आकारणीयाबाबत महावितरणाकडे विचारणा केली असतांना डिसेंबर महिन्यात मीटर रीडींग घेतल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामळे जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये मीटर रिडींग न घेता अंदाजे विज देयकांची आकारणी केल्याचे निष्पन्न होते.