शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो बीअर बार बंद, तरीही उत्पन्नात वाढ!

By admin | Updated: July 11, 2017 06:15 IST

दारू दुकाने बंद झाली असली तरी राज्य शासनाचे उत्पादन शुल्कापासूनचे उत्पन्न कमी न होता वाढल्याची बाब समोर आली आहे.

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतचे बीअर बार आणि दारू दुकाने बंद झाली असली तरी राज्य शासनाचे उत्पादन शुल्कापासूनचे उत्पन्न कमी न होता वाढल्याची बाब समोर आली आहे. २०१६मध्ये ही बंदी नसताना एप्रिल ते जून या तीन महिन्यांत उत्पादन शुल्कापोटी जेवढे उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जमा झाले त्याहून सहा टक्के जादा उत्पन्न यंदाच्या या तीन महिन्यांमध्ये झाले आहे. गेल्या वर्षी या काळात २६४० कोटी रुपये जमा झाले होते. यंदाच्या तीन महिन्यांत हा आकडा २८०० कोटी रुपयांवर गेला. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील १५,५०० बीअर बार आणि दारू दुकाने बंद झाली. त्यामुळे उत्पादन शुल्क वर्षाकाठी आठएक हजार कोटींनी कमी होईल, असा दावा केला जात होता. मात्र तीन महिन्यांतील आकडेवारी या दाव्याला छेद देणारी आहे. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उत्पन्नात वाढ झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. २०१६-१७मध्ये राज्याला १२ हजार ४०० कोटींचे उत्पादन शुल्क मिळाले होते. त्यात वाढ होऊन ते २०१७-१८ या आर्थिक वर्षात १४ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज होता. तथापि, न्यायालयाच्या निर्णयाने गणित बिघडून ते जवळपास ६० टक्क्यांनी कमी होईल, अशी भीती व्यक्त होत होती. >आज होणार फैसलाराज्य वा राष्ट्रीय महामार्गांचे हस्तांतरण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे करून हायवे लगतची दुकाने पुन्हा सुरू करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. हे हस्तांतरण अवैध ठरविण्यासंदर्भातील याचिकेवर उद्या, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. >तळीरामांनी शोधला ‘मार्ग’न्यायालयीन निर्णयामुळे एका गावातील चारपैकी दोन दुकाने बंद झाली असली तरी तळीरामांनी आपला मोर्चा सुरू असलेल्या दुकानांकडे वळविला आहे. सुरू असलेल्या बार/दुकानांवर प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे विक्री कमी झालेली नसावी, असे उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उत्पादनही वाढले!उत्पादन शुल्काची वसुली ही दारू उत्पादक कंपन्यांकडून केली जाते. दारू दुकाने बंद झाल्याचा विपरीत परिणाम उत्पादनावरदेखील होईल, असे म्हटले जात होते. तथापि, तेही कमी झाल्याचे दिसत नाही. राज्यातील १५ हजार दारूविक्री दुकाने बंद असतानाही उत्पादित दारूची विक्री कुठे झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.