शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी २० हजार वनकर्मचारी बेमुदत संपावर

By admin | Updated: August 26, 2014 02:54 IST

२० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी राज्य शासनाकडून मंजूर होत नसल्यामुळे कल्याण-शहापूरसह ठाणे जिल्ह्यातील तीन हजार कर्मचाऱ्यांसह राज्यातील २० हजार वनकर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत

ठाणे : राज्यातील वनरक्षक-वनपालांच्या वेतनश्रेणीची २० वर्षांपासूनची प्रलंबित मागणी राज्य शासनाकडून मंजूर होत नसल्यामुळे कल्याण-शहापूरसह ठाणे जिल्ह्यातील तीन हजार कर्मचाऱ्यांसह राज्यातील २० हजार वनकर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. मागण्या मान्य होत नसल्यामुळे संपावर जाण्याबाबतची नोटीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वनरक्षक तसेच पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली. महसूल, पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी १९६२मध्ये सारखीच म्हणजे साधारण ४० रुपये इतकी होती. त्या वेळी वन विभागाला २०५ तर महसूल २६० आणि गृह विभागाच्या हवालदाराला ११० रुपये मासिक वेतन देण्यात आले. नंतर, वनपालांना १९९६च्या पाचव्या आयोगानंतर चार हजार रुपये तर महसूलच्या नायब तहसीलदारांना आणि पोलीस उपनिरीक्षकांना ५५००ची वेतनश्रेणी देण्यात आली आहे. वेतनश्रेणीतील तफावत आणि करोडोंच्या वनजमिनीचे रक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याच्या मागणीसाठी या कर्मचाऱ्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याची माहिती संघटनेने दिली. वन हा कॉनसेंट लिस्टचा विषय असून, केंद्र शासनाच्या शिफारशींनुसार वनरक्षक यांना महसूल विभागातील तलाठी आणि पोलीस हवालदार तसेच वनपाल यांना महसूल विभागातील राजस्व निरीक्षक आणि गृह विभागातील पोलीस उपनिरीक्षकपदाची समकक्षता दाखवली. त्यामुळे संघटनेची मागणी केंद्र शासनाने दाखवलेल्या समकक्षपदाची वेतनश्रेणी कमीतकमी सहाव्या वेतन आयोगापासून द्यावी, अशी संघटनेची मागणी आहे.