शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सनातन आश्रमात सापडलेले ते पदार्थ औषधेच!

By admin | Updated: September 10, 2016 04:58 IST

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सनातनच्या देवद आश्रमावर विशेष तपास पथकाने छापा टाकत औषधांचा साठा जप्त केला

मुंबई : गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सनातनच्या देवद आश्रमावर विशेष तपास पथकाने छापा टाकत औषधांचा साठा जप्त केला. मात्र त्याऐवजी पोलिसांकडून अमलीपदार्थ जप्त केल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वर्तक म्हणाले की, सनातनला बदनाम करण्यासाठी एसआयटीकडून बिनबुडाचे आरोप होत आहेत. याआधीही सीबीआयने कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आश्रमाची तपासणी केली आहे; शिवाय येथील साधकांचीही चौकशी झाली आहे. त्याचा सर्व अहवाल सीबीआयकडून मिळू शकत असतानाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी एसआयटीने उत्सवाच्या काळात छापा टाकला. शिवाय पहाटे साडेचार वाजेपर्यंत म्हणजेच १६ तास चौकशीत गुंतवून साधकांचा मानसिक छळ केला.महत्त्वाची बाब म्हणजे एसआयटीला या छाप्यात काहीही मिळाले नसल्याचा सनातनचा दावा आहे. तरीही आश्रमातील दवाखान्यातील नि:शुल्क औषधे जप्त करून एसआयटीने अमलीपदार्थांचा साठा जप्त केल्याचा कांगावा केला आहे. मुळात आश्रमातील साधकांच्या उपचारासाठी २० ते ३० वर्षांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव असणारे मान्यताप्राप्त आणि तज्ज्ञ डॉक्टर येथील दवाखाना चालवतात. दवाखान्यात लागणारी औषधे ही सर्व अधिकृत बिलांसह घेतली जातात. ‘औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायदा १९४०’नुसार मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधांचा साठा आणि वितरणासाठी लागणाऱ्या परवान्यात पूर्णत: सवलत दिलेली आहे. तरीही औषधे जप्त करून त्याचा पंचनामा पोलिसांनी काही माध्यमांना बेकायदेशीररीत्या देऊन सनातनची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)>हिंदुत्ववादी सरकार निरुपयोगीराज्यात हिंदुत्ववादी पक्षाचे सरकार असतानाही सनातन संस्थेचा विनाकारण छळ होत असल्याने वर्तक यांनी खंत व्यक्त केली. सरकारसमोर संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. त्यामुळे कार्यवाही न करणारे सरकार निरुपयोगी असल्याचे सनातनने सांगितले.