शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्फोटकांचे नक्षल कनेक्शन

By admin | Updated: February 9, 2015 05:51 IST

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील पांढुरणे गावातून हस्तगत झालेली स्फोटकांची मोठी खेप नक्षलवाद्यांना पुरविण्यात येणार होती,

मुंबई : महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील पांढुरणे गावातून हस्तगत झालेली स्फोटकांची मोठी खेप नक्षलवाद्यांना पुरविण्यात येणार होती, अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या चौकशीतून समोर आली आहे. एटीएसच्या नागपूर युनिटने २ दिवसांपूर्वी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने ही स्फोटके पकडली होती. या प्रकरणी राजस्थानच्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. स्फोटकांची ही मोठी खेप हस्तगत करून एटीएसने नक्षलवाद्यांकडून भविष्यात घडविण्यात येणारे स्फोट रोखल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०च्या सुमारास महाराष्ट्र सीमेवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा, पांढुरणे गावातील एका घरावर छापा घालून नागपूर युनिटच्या अधिकाऱ्यांनी १७६८ इलेक्ट्रीक डीटोनेटर्स, केल्वेक्स पॉवर ९० क्लास २ प्रकारातल्या ६१२ कांड्या, ८४० फूट वायर आणि सुरुंग स्फोट घडविण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य हस्तगत केले. हे घर कुशल विठोबा माडणकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे आहे. त्यामुळे एटीएसने पांढुरणे पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. कुशल यांच्या चौकशीतून मुकेश आणि राजकमल सांकला या दोन राजस्थानी तरुणांची माहिती एटीएसला मिळाली. ते गेल्या काही दिवसांपासून कुशल यांच्या घरी स्फोटकांसह दडून होते, असे समजते. त्यांना एटीएसने भारतीय स्फोटके कायद्यातील कलमांनुसार अटक केली. चौकशीत या दोघांनी याआधीही महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये अशा प्रकारे स्फोटकांचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली. त्यानुसार एटीएस अधिकारी त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)