शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्त्रीशक्तीच्या जागरात नवजात बालिकेच्या गळ्याला नख

By admin | Updated: October 6, 2016 22:50 IST

नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात मात्र कौयार्ने परिसीमा गाठली. चार मुलींच्या पाठीवर जुळ्या मुलीच

-  सुरेंद्र राऊत/ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि.06 - नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात मात्र कौयार्ने परिसीमा गाठली. चार मुलींच्या पाठीवर जुळ्या मुलीच झाल्याने जन्मदात्यांनीच नवजात बालिकेच्या गळ््याला नख लावले. जगात पाऊल ठेवताच तिला यमसदनी धाडले. वंशाच्या दिव्याच्या हव्यासात घडलेल्या या कृत्याने शासकीय रुग्णालयाच्या भिंतीही नि:शब्द झाल्या. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उमरखेड तालुक्यातील चिल्ली येथील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली. तिने सोमवारी पहाटे ६.१५ वाजता १५ मिनीटाच्या अंतरात जुळ्या मुलींना जन्म दिला. चार मुलींच्या पाठीवर दोन जुळ्या मुली झाल्याने कुटुंब खिन्न झाले. नवागताच्या जन्माचा कोणताही आनंद चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यातच पहिल्यांदा जन्मला आलेल्या मुलीचे वजन कमी होते. निपचित दिसत असल्याने तिला बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र अपेक्षा भंग झालेल्या पित्याने या कक्षात उपचारासाठी नेण्यास स्पष्ट नकार दिला. तसे लेखीही डॉक्टरांना दिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुली जन्माला आल्याचा तणाव दिसत होता. अशा तणावातच रात्र झाली. तोपर्यंत वजनाने कमी असलेल्या मुलीची हालचाल सुरू झाली. त्यावेळी या मुलींजवळ बाळंतीण आणि आजी होती. तर पिता प्रसूती वाडार्बाहेर झोपला होता. मुलीची हालचाल बंद झाल्याचे लक्षात येताच आजीने वाडार्तील नर्सला सूचना दिली. नर्सने बालरोग विभागात जाण्याचा पुन्हा सल्ला दिला. तेव्हा पिता आणि आजी त्या मुलीला घेऊन बालरोग विभागात गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषित केले.यानंतर चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दुपारी प्राथमिक अहवाल आला. तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण दिसून आले. चिमुकलीचा मृत्यू आजाराने नव्हे तर गळा आवळल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातही निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात अज्ञात व्यक्तीने चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचे नमूद आहे. पोलिसांनी तूर्तास या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी मात्र निश्चित केला नाही. जन्मदात्यांवरच पोलिसांचा संशय असून पाठोपाठ झालेल्या मुलीमुळेच हे कृत्य केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहे.पाच मुलींच्या भविष्याचा प्रश्न नवजात मुलीचा गळा आवळल्याने चील्ली येथील दाम्पत्य आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे. मात्र पोलींसासमोर गुन्हा दाखल करताना वेगळाच पेच निर्माण झाला आहे. नेमका गळा कुणी आवळला हे निश्चित नाही. मात्र जन्मदात्यापैकी कुणालाही आरोपी केले तरी इतर पाच मुलींच्या भविष्याचे पुढे काय, असा प्रश्न पुढे येत आहे. कर्तव्य की माणुसकी अशा पेचात नेमका कुणावर गुन्हा दाखल करावा हा प्रश्न शहर पोलिसांना सतावत आहे. या प्रकरणात सदर मुलीच्या पित्यावर कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याची माहिती आहे.