शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
4
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
5
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
6
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
7
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
8
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
9
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
10
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
11
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
12
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
13
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
14
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
15
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
16
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
17
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
18
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
19
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
20
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

थोर विचारवंत, पत्रकार गमावला : राज्यपाल

By admin | Updated: January 20, 2016 02:31 IST

डॉ. अरुण टिकेकर हे व्यासंगी अभ्यासक, इतिहासकार आणि उत्कृष्ट पत्रकार होते. इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते व त्यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यासंगाची तसेच बहुश्रुतपणाची प्रचिती येत असे

मुंबई : डॉ. अरुण टिकेकर हे व्यासंगी अभ्यासक, इतिहासकार आणि उत्कृष्ट पत्रकार होते. इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते व त्यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यासंगाची तसेच बहुश्रुतपणाची प्रचिती येत असे. टिकेकर यांच्या निधनाने राज्याने थोर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार गमावला आहे. अशा शब्दांमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. टिकेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे अनेक नामवंतांनी दु:ख व्यक्त केले आहे.डॉ. टिकेकर यांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार आणि माहिती व संशोधनपूर्ण लिखाण करणारा अभ्यासक गमाविला, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. टिकेकर यांच्या निधनाने मुंबई विद्यापीठाने एक सुहृद सल्लागार आणि स्नेही गमावला आहे, याचे मला आणि विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, संशोधक यांना तीव्र दु:ख होत आहे, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. कायम जाणीव राहीलअरुण टिकेकर यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक सव्यसाची आणि विचारवंत संपादक मिळाले होते. ‘फास्ट फॉरवर्ड’ या माझ्या संग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर विविध चर्चा व्हायची. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत त्यांनी परिश्रमपूर्वक स्थान मिळवले होते. त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव पुढील पिढ्यांनासुद्धा राहील.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी अभ्यासू वृत्तीचा विचारवंतएक गंभीर व अभ्यासू विचारवंत, सव्यसाची लेखक, १९व्या शतकाचे गाढे अभ्यासक, निर्भीड पण संयमी संपादक व सारे आयुष्य आपली विद्यार्थीदशा जोपासलेले विद्यार्थी ही अरु ण टिकेकरांची महाराष्ट्रास असलेली ओळख आहे. ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘लोकमत’ या तीनही मोठ्या मराठी दैनिकांचे संपादक राहिल्याचा मान त्यांच्या गाठीशी आहे. ग्रंथकार, ग्रंथालयाचे संचालक आणि अतिशय निर्मळ व स्वच्छ मनाचा माणूस अशीही त्यांची ओळख साऱ्यांना आहे. त्यांचा व ‘लोकमत’चा संबंध त्या दोहोंचीही ऊर्जा, प्रतिष्ठा व लोकप्रियता उंचावणारा ठरला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका जाणत्या विचारवंताला मुकला आहे. - खा. विजय दर्डापत्रकारितेचे मोठे नुकसानपत्रकारितेच्या बदलत्या स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासाचा जाणकार हरपला आहे. - अरुण साधू, ज्येष्ठ पत्रकारव्यासंगी पत्रकार : ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी होत असलेल्या सामाजिक बदलांना आपल्या लेखणीतून अधोरेखित केले. पत्रकारितेची मूल्ये जपणारे आणि लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडणारे व्यासंगी पत्रकार हरपले आहेत. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्रीनिर्भीड, नि:ष्पक्ष पत्रकार : अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे एक निर्भीड व नि:पक्ष पत्रकार, तसेच लोकांशी थेट जुळलेले एक अभ्यासू विचारवंत हरपले आहेत. टिकेकर यांच्या निधनामुळे वैचारिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते विधानसभाअसामान्य प्रतिभेचा विचारवंत मराठी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील असामान्य प्रतिभा लाभलेले विचारवंत लेखक आपल्यातून निघून गेले आहेत. मराठी व इंग्रजी साहित्य यावर टिकेकरांचे विशेष प्रभुत्व होते. महाराष्ट्र व मुंबईच्या इतिहासाविषयी त्यांचा गाढा अभ्यास होता. आज टिकेकर या जगात नाहीत, परंतु लढवय्या पत्रकार, संपादक म्हणून ते अजरामर राहतील.- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री