शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात सात महिन्यांत १८२ बालमृत्यू

By admin | Updated: January 10, 2017 04:35 IST

आदिवासी, दुर्गम भागातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत. तरीदेखील अवघ्या सात महिन्यांत १८२ बालमृत्यू झाल्याची नोंद आढळून

सुरेश लोखंडे/ ठाणेआदिवासी, दुर्गम भागातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत. तरीदेखील अवघ्या सात महिन्यांत १८२ बालमृत्यू झाल्याची नोंद आढळून आली आहे. यामध्ये एक ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांचा समावेश आहे. मातामृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, प्राप्त झालेल्या बालमृत्यूंची संख्या पाहता त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचे प्रयत्न काही सामाजिक संघटनांकडून केले जात आहेत. जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांत २०१६च्या एप्रिल ते नोव्हेंबर या सात महिन्यांत ही बालके दगावली आहेत. यामध्ये एक ते सहा वर्षाच्या २० बालकांचा समावेश आहे. तर, ७१ बालके एक वर्षापर्यंतची आहेत आणि शून्य ते सहा वर्षापर्यंतची ९१ बालके दगावलेली आहेत. दगावलेल्या बालकांमध्ये कमी वजनाची, जन्मत: व्यंग, हृदयविकार, हायपोथर्मिया, अ‍ॅस्पिरेशान न्यूमोनिया, अ‍ॅस्पेक्शिया, श्वासावरोध, हेमॅटीमिसिस, सेप्टीसिमिया, अतिज्वर, ज्वर झटके, सर्पदंश, अननोन बाइट, नेफियटीक सिंड्रोम, एचआयव्ही बाधित, न्यूमोनिया आणि इतर आजारांस बळी  पडून हे बालमृत्यू झाल्याचे गाभा समितीच्या बैठकीत उघड झाले. (प्रतिनिधी)