शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सोळा लाखांचे दागिने हॉटेलमधून चोरीस

By admin | Updated: December 28, 2015 01:24 IST

येथील हॉटेल बिजीस हिल रीट्रीट येथे लग्नसमारंभासाठी आलेल्या एका महिलेचे ६५ हजारांच्या रोख रकमेसह सुमारे १६ लाख २५ हजार रुपयांचे दागिने रूममधून चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी

लोणावळा : येथील हॉटेल बिजीस हिल रीट्रीट येथे लग्नसमारंभासाठी आलेल्या एका महिलेचे ६५ हजारांच्या रोख रकमेसह सुमारे १६ लाख २५ हजार रुपयांचे दागिने रूममधून चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) रात्री घडली.सुनीता संजय जैन (वय ४८, रा. अंधेरी, मुंबई) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता जैन आणि त्यांची जाऊ नूतन संतोष जैन या दोघी २३ डिसेंबर रोजी लग्नासाठी हॉटेल बिजीस हिल रीट्रीट येथे आल्या होत्या. त्यांनी त्यांचे सोने, तसेच हिऱ्यांचे दागिने सोबत आणले होते. २४ डिसेंबरच्या रात्री संगीतसंध्या हा कार्यक्रम संपल्यावर मध्यरात्री १२.३०ला दोघी आपल्या रूममध्ये येऊन झोपी गेल्या. २५ डिसेंबरला पहाटे ५.३०ला नूतन या झोपेतून उठल्या आणि स्नान झाल्यावर ६.३०च्या सुमारास तयार होण्यासाठी ड्रेसिंग टेबलकडे गेल्या असता, दागिने नसल्याचे लक्षात आले. दिवसभर शोधाशोध करूनही दागिने न सापडल्याने २६ डिसेंबरला पोलीस तक्रार करण्यात आली. या चोरीमध्ये ६५ हजार रोख रक्कम, दीड लाखाची गळ्यातील हिऱ्याची माळ, चार लाखांचा हिऱ्याचा सेट, दोन लाख ८५ हजारांचा सोन्याचा हार, ७५ हजारांच्या सोन्याच्या दोन बांगड्या, तीन लाखांचा गळ्यातील हिऱ्याचा हार, ९० हजारांचा सोन्याचा हार, ७५ हजारांची सोन्याची चैन, एक लाखाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजारांचे डोक्यात घालायचे बोर, १५ हजारांची सोन्याची अंगठी, एक लाखाची हिऱ्याची बांगडी आदी ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश अपसुंदे तपास करीत आहेत. (वार्ताहर)