शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या घरासमोर आज घंटानाद

By admin | Updated: November 3, 2015 03:02 IST

गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत सत्ताधारी भाजपा आमदारांनी साधलेली चुप्पी आणि भाजपा सरकारकडून प्रशासनावर वाढता दबाव याच्या निषेधार्थ मंगळवारी

नाशिक : गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याबाबत सत्ताधारी भाजपा आमदारांनी साधलेली चुप्पी आणि भाजपा सरकारकडून प्रशासनावर वाढता दबाव याच्या निषेधार्थ मंगळवारी येथील भाजपा आमदारांच्या घरासमोर घंटानाद करत त्यांना ‘जागते व्हा’चा इशारा देण्याचा निर्णय रात्री उशिरा झालेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झाला. पाणीप्रश्नी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी व नाशिककरांचा मोर्चा काढण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागृती करण्याचेही निश्चित करण्यात आले.आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाली. महापौर अशोक मुर्तडक, आ. अनिल कदम, आ. जयंत जाधव, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृह नेते सलीम शेख, विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक, मनसेचे गटनेते अनिल मटाले आदी बैठकीला उपस्थित होते. पाणीप्रश्नी सारे शहर तापले असताना सत्ताधारी भाजपा आमदारांनी सोयीस्कर मौन स्वीकारल्याचे सर्वपक्षीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)...तर दोन-तीन दिवसाआड पाणीगंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे. त्याचा परिणाम शहरातील पुरवठ्यावर होईल. सद्यस्थितीत महापालिकेने ९ आॅक्टोबरपासून पाणीकपात करत एकवेळ पाणी पुरवठा केला आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे काही दिवसांत शहराला दोन-तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, असे महापौर म्हणाले.