ऑनलाइन लोकमतलातूर, दि. ३१ : शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री ९ वा़ पासून मध्यरात्री २ वा़ पर्यंत दमदार पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यात सर्वाधिक १२१ मिमी पाऊस झाला़ नागझरी व साई येथील बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा झाला आहे़ साई बॅरेजेस ४ मीटरने भरले असून नागझरी बंधाराही निम्मा भरला आहे़ रेणापूर तालुक्यातील रेणा आणि औराद शहाजानी परिसरातून तेरणा नदी वाहू लागली आहे़
शनिवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवर असलेले कारसा पोहरेगाव, वांजरखेडा, खुलगापूर, डोंगरगाव आदी बंधारे भरले आहेत़ शिवाय, घरणी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून रेणा व तावरजात १० टक्के पाणीसाठा झाला आहे़ लातूरपासून जवळच असलेल्या नागझरी येथील बंधारा निम्मा भरला असून या बंधाऱ्याच्या खालच्या भागातील साई बंधाराही पूर्ण भरला आहे़ लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस होत असून गेल्या २४ तासांत ६९़.४२ मिमी पाऊस झाला आहे़
रेणापूर तालुक्यात मुसळधार पांऊस झाला असून १२१़.२५ मिमी अशी नोंद आहे़ त्यापाठोपाठ चाकूर तालुक्यात ११३़.८० मिमी पाऊस झाला आहे़ परिणामी, या तालुक्यातील घरणी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे़ लातूर तालुक्यात ७३़.५० मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्यातील गादवड, तांदुळजा, मुरुड परिसरात अतिवृष्टी झाली असून मुरुडानदीला पाणी आले आहे़ या पाण्याचा विसर्ग मांजरा नदीकडे होत असून नागझरी बंधाऱ्यात हे पाणी आले आहे़.
दरम्यान, धनेगाव येथील मांजरा प्रकल्प परिसरात गेल्या २४ तासांत ७२ मिमी पाऊस झाला असला तो प्रकल्पाच्या खालच्या बाजूला पडला आहे़ त्यामुळे मांजरा प्रकल्पात अद्याप पाणीसाठा झाला नाही़ प्रकल्पाच्या वर कळंब परिसरात १४, पाटोदा ०२ मिमी पाऊस झाला आहे़ धरणाच्या सीमेरेषेवर पाऊस नसल्याने प्रकल्पात साठा झाला नसल्याचे ह्यमांजराह्णचे शाखाधिकारी अनिल मुळे यांनी सांगितले.