शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

तहानलेला मराठवाडा यंदा झाला तृप्त!

By admin | Updated: September 27, 2016 05:32 IST

तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, परतीच्या धुवाधार पावसामुळे विभागाने सहा वर्षांत दुसऱ्यांदा सरासरी गाठली आहे.

- सुनील कच्छवे, औरंगाबाद

तीन वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून, परतीच्या धुवाधार पावसामुळे विभागाने सहा वर्षांत दुसऱ्यांदा सरासरी गाठली आहे. पावसामुळे जमिनीत चांगली ओल आली असून, त्यामुळे रब्बी हंगामात पिकांखालील क्षेत्र वाढणार आहे.तीन वर्षांपासून मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरविली होती. दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नात मोठी घट झाली. यंदा मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी ९९.६७ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७७९ मि.मी. इतके आहे. त्या तुलनेत विभागात आतापर्यंत ७७६ मि.मी. पाऊस झाला आहे. १३ वर्षांत २०१० हे मराठवाड्यात सर्वाधिक पावसाचे वर्ष राहिले. तेव्हा वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल १२५ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतरची दोन वर्षे पुन्हा विभागात मोठी तूट होती. २०१३मध्ये ११० टक्केपाऊस झाला. पुढची दोन वर्षे पुन्हा सरासरी केवळ ५० ते ५५ टक्के एवढाच पाऊस झाला.विभागात रब्बी पिकांखालील सरासरी क्षेत्र २० लाख ७७ हजार हेक्टर एवढे आहे. दोन वर्षांत अपुऱ्या पावसामुळे त्यातील निम्म्या क्षेत्रावरही पेरा झाला नव्हता. यंदा हे क्षेत्र निश्चितच वाढणार आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये रब्बीचे क्षेत्र ८ लाख ६४ हजार एवढे आहे. ते ८ लाख ९९ हजार हेक्टरवर जाण्याची अपेक्षा विभागीय कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांनी व्यक्त केली.‘मांजरा’चे सहा दरवाजे उघडलेबीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना वरदान ठरलेले मांजरा धरण चार वर्षांनंतर १०० टक्के भरले असून, सोमवारी धरणाचे १८पैकी ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. ‘मांजरा’खालील २० गावांत पूरस्थिती असून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तावरजा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्याचे तीन दरवाजे उघडले आहेत. तीन वर्षांपासून प्रकल्प कोरडा होता. लातूरला सर्वाधिक पाऊस! दुष्काळाचे चटके सहन करावे लागलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के तर बीड जिल्ह्यात १०९ टक्के पाऊस झाला.१२ वर्षांत ५ वेळा सरासरी : बारा वर्षांत केवळ पाच वेळा मराठवाड्यात सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे.