शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या तिसऱ्या फेरीला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: July 16, 2016 01:13 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावीचा तिसऱ्या फेरीतून आॅनलाइन प्रवेश घेण्याची आज अंतिम तारीख होती. अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८०७६ इतकी होती

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अकरावीचा तिसऱ्या फेरीतून आॅनलाइन प्रवेश घेण्याची आज अंतिम तारीख होती. अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८०७६ इतकी होती. मात्र त्यातील केवळ ८५०२ विद्यार्थ्यांनीच कला, वाणिज्य व विज्ञान या विभागांत प्रवेश घेतल्याने या फेरीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. याबाबत पुणे विभागाच्या सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘शुक्रवारी अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाली. तिसऱ्या यादीत ७ हजार ३७३ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार वरच्या महाविद्यालयात अर्थात बेटरमेंटची संधी मिळाली आहे. दहावीत चांगले गुण असूनही अकरावीला पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार कायम आहेत. प्रवेशाची तिसरी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांचा तक्रारीचा ओघ वाढला आहे. पसंतीक्रमानुसार प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे लेखी अर्ज दिले जात आहेत. मात्र त्याची दखल घेतली जाणार का, याविषयी पालकांनी साशंकता व्यक्त केली जात आहे. १८ हजार ७६ विद्यार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात ९ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नसल्याने त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर पडले आहेत. याबरोबरच ४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले असून १९३ विद्यार्थ्यांनी स्वत:हून आपला प्रवेश रद्द केला आहे. यामध्ये कला शाखेच्या मराठी माध्यमासाठी ४३ जणांनी, तर इंग्रजी माध्यमासाठी ९१ जणांनी प्रवेश घेतला आहे. वाणिज्य शाखेतील मराठी माध्यमासाठी १२३५ जणांनी व इंग्रजी माध्यमातील २५२६ जणांनी प्रवेश घेतला. याबरोबरच विज्ञान शाखेसाठी तिसऱ्या फेरीतून ४६०७ जणांनी प्रवेश घेतला आहे.