शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तिस-या अपत्यामुळे संचालकपद रद्द

By admin | Updated: August 9, 2016 21:46 IST

तिस-या अपत्यामुळे एका संचालकावर पद रद्द होण्याची नामुष्की ओढावली आहे. भंडारा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत हा प्रकार घडला आहे.

ऑनलाइन लोकमत
 
भंडारा, दि. 09 - तिस-या अपत्यामुळे एका संचालकावर पद रद्द होण्याची नामुष्की ओढावली आहे. भंडारा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत हा प्रकार घडला आहे. सदर संचालकाचे पद रद्द करण्याचा निर्वाळा भंडारा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे यांनी दिला. 
निवडणूक लढणा-या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास निवडणूक लढता येत नाही. यापूर्वी अपत्य लपविणाºया उमेदवारांचे पद रद्द झाल्याची नामुष्की अनेकांवर ओढावली आहे. भंडारा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक मार्तंड गायधने यांना तीन अपत्य असल्याने संचालकपद रद्द झाले आहे. 
मोहदुरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.मार्तंड गायधने यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची संचालकपदाची निवडणूक लढविली होती. यात ते निवडून आले. दरम्यान  गणेशपूर येथील विजय भुरे यांनी त्यांच्याविरुद्ध सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत गायधने यांना तीन अपत्य असल्याचे पुरावे सादर केले. भुरे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे यांनी कागदपत्रांची तपासणी करून गायधने यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९० चे कलम ७३ क अ (७) नुसार अपात्रतेची कारवाई केली. 
ही कारवाई होण्यापूर्वी सहाय्यक निबंधकांनी गायधने यांना बाजू मांडण्याची संधी दिली. यात त्यांना दिलेल्या वेळेत त्यांनी हजेरी न लावता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणाची सुनावणी ५ आॅगस्टला ठेवण्यात आली होती. यात भुरे यांनी केलेली तक्रार योग्य असून ती मान्य असल्याचे गायधने यांनी कबुल केले. याप्रकरणी सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे यांनी गायधने अपात्र असून संचालक मंडळातून बरखास्त करण्याचे आदेश पारीत केले.