शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांची मागणी :काम द्या; टाळी वाजविणार नाही!

By admin | Updated: August 12, 2016 01:06 IST

घरच्यांनी हाकलून दिलं. समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगाराचं कामही करू. पण ते देखील मिळत नाही

पुणे : घरच्यांनी हाकलून दिलं. समाजाने स्वीकारलं नाही. काम करायची इच्छा आहे. आम्ही सफाई कामगाराचं कामही करू. पण ते देखील मिळत नाही. म्हणून नाईलाजाने भीक मागावी लागते. आम्हाला काम द्या, टाळी वाजविणार नाही, अशी भावना तृतीयपंथीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृतीयपंथीयांना न्याय्य हक्क द्या, त्यांनाही माणूस म्हणून वागवा. शासकीय पातळीवरूनच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, असे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील तृतीयपंथीयांशी संवाद साधला असता निसर्गाने घोर अन्याय केलाच, पण त्यापेक्षा समाज त्यांना दररोज मरणयातनाच देतो, असे दिसून आले. येरवडा परिसरातील आप्पा पुजारी यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी भांडायला सुरुवात केली आहे. पण याची दखल कोणी घेत नाही. आम्हालाही इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. पण अज्ञानाच्या गर्तेत आमचे लोक आहे. शासकीय पातळीवरही आमच्याबाबत अनास्थाच दिसते, असे आप्पा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. आप्पा म्हणाला, ‘‘ मला लहानपणापासून मुलींसारखे बोलायला आवडायचे. त्यांच्यात बसायला आवडायचे. मुलांच्या चिडविण्याला कंटाळून शाळाही सोडावी लागली. माझ्यामुळे सगळ्या नातेवाइकांनी घरच्यांशी संपर्क तोडला. वयाच्या दहाव्या वर्षी मी घर सोडून मुंबईला गेले. १५ वर्षांनंतर मी जेव्हा पुण्यात आले आणि माझ्या घरी राहायला लागले. पुण्यात आल्यावर काम मागायला गेले असता हाकलून लावण्यात आले. त्यामुळे पैसे मागायला सुरुवात केली. समाजाने आम्हाला स्वीकारावे.’’मोनिकाची कहाणी तर खूप वेगळी. मूळची हैदराबादची असलेली मोनिका दहावीपर्यंत शिकली आहे. मोनिका म्हणाली, ‘‘शिक्षणाची आवड होती, पण शाळेतील सवंगड्यांकडून क्रूरतेचा अनुभव आला. त्यामुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. मुलीसारखे राहात असल्याने घरच्यांनी हाकलून दिले. वयाच्या १५व्या वर्षी घर सोडून मी पुण्याला आले. काम शोधायला सुरुवात केली. पण लोकांनी हाकलून दिले. त्यामुळे टाळी वाजवून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.’’