शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

खासदार शेट्टींच्या नेतृत्वाखाली तिसरा पर्याय?

By admin | Updated: July 9, 2014 01:44 IST

शिवसेना-भाजपासह दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना एकत्र करून विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

विश्वास पाटील - कोल्हापूर
शिवसेना-भाजपासह दोन्ही काँग्रेसमधील नाराजांना एकत्र करून विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार राजू शेट्टी व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रयत्न आहेत. साखरपट्टय़ातील मातब्बर नेत्यांची एकजूट करून किमान 45 जागा लढविता येतील का, यासंबंधीची चाचपणी सुरू झाली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीला एकत्र बांधून ठेवणारा नेता नसल्याने शिवसेना-भाजपामध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीत युतीला विधानसभेच्या 245 मतदारसंघांत मताधिक्य मिळाल्याने नेते हवेत आहेत. दोन्ही काँग्रेसमध्ये स्वबळावर लढण्याची भाषा केली जात आहे. 
शिवसेना-भाजपानेही तसाच शड्ड ठोकला तरी युतीशिवाय दोन्ही पक्षांकडे पर्याय नाही. परंतु मुंडे यांच्या निधनामुळे समन्वयाचा धागा  तुटल्याचे महायुतीतीलच नेत्यांनाही जाणवू लागले आहे. सांगलीतून भाजपाचे नाराज आमदार संभाजी पवार यांच्या मुलाऐवजी 
नीता केळकर यांना उमेदवारी देण्याचा आग्रह खासदार संजय पाटील यांच्याकडून धरला 
जात आहे. प्रकाश शेंडगे व सुरेश खाडे 
यांच्या उमेदवारीवरूनही अशीच रस्सीखेच
सुरू आहे. 
महायुतीतील या कुरघोडीच्या राजकारणामुळे खासदार शेट्टीही नाराज आहेत. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून  तिसरा पर्याय उपलब्ध झाल्यास प्रमुख पक्षांतील नाराजांची लढण्याची तयारी आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्राच्या राजकारणातील चार प्रमुख पक्षांतील नाराज नेत्यांना एकत्र करून काही वेगळेच व्यासपीठ स्थापन करता येईल का, अशा हालचाली सुरू आहेत.