शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

By admin | Updated: September 3, 2015 01:29 IST

आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा कॉलनी येथील शासकीय वसतिगृहात ३१ आॅगस्टपासून छेडलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरू असून,

पनवेल : आदिवासी वसतिगृहातील ३०९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ खांदा कॉलनी येथील शासकीय वसतिगृहात ३१ आॅगस्टपासून छेडलेले आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरू असून, या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपैकी सहा जणांची प्रकृती ढासळली आहे. या विद्यार्थ्यांना पनवेल ग्रामीण रुग्णालय, जे. जे . रुग्णालय, केईएम रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मागील महिन्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी पेण प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी कार्यालयीन सामानाची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी खांदा कॉलनी येथील ९ विद्यार्थ्यांसह एकूण ३०० विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले होते. या कारवाईच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण छेडले आहे. या आंदोलनाला श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी त्यांनी खांदा कॉलनी येथील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. बुधवारी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना विविध ठिकाणी उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सुनील तोटावड, योगेश बहिरम, दादाभाऊ धिंदळे, किसन वाघ, बाळासाहेब पांढरे, गुरुनाथ म्हसे या सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी पनवेल नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील, शेकाप नेते जे. एम. म्हात्रे, नारायण घरत, काशिनाथ पाटील, रमेश पाटील आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)