शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

त्या कर्मचा-यांचा भरतीप्रक्रियेत विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:46 IST

आदिवासी आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी गेली अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर किंवा रोजंदारीवर कार्यरत आहेत. त्यांनी भरतीप्रक्रियेत सहभागी व्हावे

मुंबई : आदिवासी आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी गेली अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर किंवा रोजंदारीवर कार्यरत आहेत. त्यांनी भरतीप्रक्रियेत सहभागी व्हावे, शैक्षणिक पात्रतेचे निकष आणि अनुभवानुसार कर्मचारी भरतीदरम्यान त्यांचा सहानुभूतीपूर्ण विचार करण्यात येईल, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी विधानसभेत सांगितले.राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील वर्ग तीन व चार या वर्गवारीतील कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याबाबत उदयसिंग पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.सवरा म्हणाले, आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी तासिका आणि रोजंदारीवर कार्यरत आहेत. ते तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते. पूर्वीच्या कर्मचाºयांना सरसकट भरतीने नियमित करता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच शासनाने भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी या भरतीप्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि अनुभवाचा सहानुभूतीपूर्ण विचार शासन करेल, दरम्यान या कर्मचाºयांच्या मानधनात शासनाने वाढ केली असल्याचेही सवरा यांनी सांगितले.