शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाच्या योजनेचा विचार करा

By admin | Updated: July 23, 2016 04:39 IST

झोपडपट्टीधारकांचे ‘बीएसयूपी’ योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यास किंवा दरमहा संबंधितांना पाच हजार रुपये भाडे देण्यास महापालिका तयार आहे, असे ठाणे महापालिकेने शुक्रवारी उच्च न्यायालयाला सांगितले.

मुंबई : पारसिक बोगद्यावरील डोंगराच्या परिसरातील झोपडपट्टीधारक पात्र असल्यास त्यांचे ‘बीएसयूपी’ योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यास किंवा दरमहा संबंधितांना पाच हजार रुपये भाडे देण्यास महापालिका तयार आहे, असे ठाणे महापालिकेने शुक्रवारी उच्च न्यायालयाला सांगितले.न्यायालयाने त्यावर मुंब्रा येथील उदयनगरच्या झोपडपट्टीधारकांना महापालिकेच्या योजनेवर विचार करण्याची सूचना केली. तसेच याचिकाकर्त्यांना महसूल व वन विभाग आणि मध्य रेल्वेला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.मध्य रेल्वेवरील पारसिक डोंगरावर वारंवार दरड कोसळत असल्याने ठाणे महापालिकेने झोपडपट्टीधारकांना १० दिवसांत झोपड्या खाली करण्यासंदर्भात नोटीस बजावली. त्यास झोपडपट्टीधारकांना उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिकेवरील सुनावणी न्या. हिमांशु केतकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झाली.मागील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत काय करणार, अशी विचारणा ठाणे महापालिकेकडे केली. पावसाळ््याच्या चार महिन्यांकरिता नोटीस बजावण्यात आली आहे. जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकेने ही काळजी घेतली आहे. भविष्यात दुर्घटना घडल्यास महापालिकेला दोषी धरण्यात येईल. पावसाळ््यात व अन्य दिवसांतही येथे दरड कोसळतात, असे ठाणे महापालिकेतर्फे अ‍ॅड. एन. आ. बुभना यांनी खंडपीठाला सांगितले. चार महिन्यांनंतर पुन्हा झोपडपट्टीधारक मूळ ठिकाणी राहायला येऊ शकतात का, असा प्रश्न खंडपीठाने महापालिकेला केला. त्यावर बुभना यांनी कोणतेही आश्वासन देण्यास नकार दिला. हा भूखंड शासनाच्या महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत येतो. तसेच मध्य रेल्वेचीही परवानगी घ्यावी लागेल. या मार्गावरून सतत जलद लोकल धावत असतात, असे बुभना यांनी खंडपीठाला सांगितले. पात्र झोपडपट्टीधारकांसाठी महापालिकेची बीएसयूपी ही पुनर्वसन योजना आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. झोपडपट्टीधारकांनी त्यांच्या झोपड्या १९९५ पूर्वीच्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कागदपत्रे पडताळून पुढील निर्णय घेतला जाईल, असे बुभना यांनी न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी) >मध्य रेल्वे प्रतिवादीन्यायालयाने संबंधित रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या या योजनेचा विचार करण्याची सूचना केली. तसेच याचिकाकर्त्यांना राज्य सरकारच्या महसूल व वन विभाग व मध्य रेल्वेला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.