शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नवभारत निर्मितीचा विचार करा

By admin | Updated: February 25, 2017 05:05 IST

भविष्यातील नवभारताच्या निर्मितीसाठी गांभीर्यपूर्वक विचार करून नवसंशोधन, तंत्रज्ञान अशा आवश्यक बाबींचा वेध घेऊन त्याअनुषंगाने आपली भूमिका

कोल्हापूर : भविष्यातील नवभारताच्या निर्मितीसाठी गांभीर्यपूर्वक विचार करून नवसंशोधन, तंत्रज्ञान अशा आवश्यक बाबींचा वेध घेऊन त्याअनुषंगाने आपली भूमिका, कार्यशैली युवावर्गाने ठरवावी, असे आवाहन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५३ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी कोल्हापुरातील सोनाली बेकनाळकर या विद्यार्थिनीला राष्ट्रपती सुवर्णपदक तर साताऱ्यातील स्नेहल चव्हाण हिला ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणात पार पडलेल्या या दीक्षान्त समारंभात ४९ हजार ९५१ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. डॉ. काकोडकर म्हणाले, की जगाच्या सर्वांगीण विकासासाठी कसे योगदान देता येईल, याचा विचार युवा वर्गाने करावा. या विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी देश, समाज, उद्योग आदींच्या पलीकडे जावून कार्यरत राहावे. उच्चशिक्षणातील बदलती क्षितिजे काबीज करण्यासाठी त्यांनी तत्पर राहावे. उच्चशिक्षणाच्या पद्धतीमध्ये समाजाच्या विकासासह वृद्धीची क्षमता आहे. त्याला गती देण्यासाठी बहुस्तरीय अध्ययन प्रणाली विकसित करण्याची गरज आहे. देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील कौटुंबिक उत्पन्न, भूमीहीनता आदींमुळे निर्माण झालेली दरी सांधण्याची क्षमता संशोधन, विकास क्षेत्रात आहे. आपल्या देशात नवनवीन संशोधन वाढत आहे, त्याचे तंत्रज्ञानात रूपांतर करून उद्योग क्षेत्रात ते आणणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)