शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

रेल्वेचा कारभार सुधारण्याच्या तुता-या म्हणजे गाजराचीच पुंगी - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 07:23 IST

उपनगरी रेल्वे सेवेचा कारभार सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर फुंकल्या जाणा-या तुता-या म्हणजे गाजराचीच पुंगी ठरल्या आहेत, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सोडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 31 -  उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मध्य रेल्वेवर झालेल्या अपघातावरुन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. गुरुवारी कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचे पाच डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या सेवेचा बोजवारा उडाला होता. यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. याचा दाखला देत 'उपनगरी रेल्वे सेवेचा कारभार सुधारण्याच्या पार्श्वभूमीवर फुंकल्या जाणा-या तुता-या म्हणजे गाजराचीच पुंगी ठरल्या आहेत', असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सोडले आहे. 
 
 
लोकल वाहतुकीचा गोंधळ
''लोकल वाहतुकीचा गोंधळ उपनगरी रेल्वे सेवेचा कारभार सुधारण्याच्या तुतार्‍या रेल्वेच्या प्रत्येक कार्यक्रमात फुंकल्या जातात. मात्र वारंवार होणारे अपघात, डबे घसरण्याच्या घटना यामुळे सध्या तरी या तुतार्‍या म्हणजे गाजराचीच पुंगी ठरल्या आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'गुरुवारी विठ्ठलवाडी स्थानकाजवळ भल्या पहाटे लोकलचे पाच डबे रुळावरून घसरले आणि मध्य रेल्वेचे नेहमीप्रमाणे तीन तेरा वाजले. भल्या सकाळीच हा प्रकार घडल्याने नोकरीवर जाणार्‍या लाखो प्रवाशांचेही वेळापत्रक लटकले. या लोकल अपघातात कोणी जखमी वा मृत झाले नाही हे सुर्दैव असले तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे ‘दुर्दैव’ काही टळले नाही'', असेही उद्धव म्हणाले आहेत.  
 
''तब्बल अकरा तास ‘लोकलहाल’ सहन करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. एकदम पाच डबे घसरल्याने रुळांचे तसेच स्लीपर्सचे नुकसान झाले, म्हणून हा जास्त वेळ दुरुस्तीसाठी लागला, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. ते खरेही असेल; पण अनेकांना त्यामुळे कामावरच जाता आले नाही, अनेकांना प्रचंड हालअपेष्टा सहन करीत उशिरा कामाचे ठिकाण गाठावे लागले त्याचे समर्थन कसे होणार?'', असा प्रश्न उद्धव यांनी संपादकीयाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 
 
''उपनगरी रेल्वे, त्यातील प्रचंड गर्दी, वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक, त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल या मुंबईकरांसाठी अनपेक्षित घटना नाहीत. मध्य रेल्वेचा गोंधळ प्रवाशांच्या अंगवळणी पडला आहे. वास्तविक ज्या भागात गुरुवारी रुळावरून डबे घसरले त्या रेल्वे मार्गाची तपासणी २२ नोव्हेंबरला करण्यात आली होती. अल्ट्रासॉनिक पद्धतीने तपासणी करून रुळांना भेगा पडल्या आहेत का, तडे गेले आहेत का हे पाहिले जाते. तरीही गुरुवारचा अपघात घडलाच. अपघात ठरवून होत नाही हे मान्य केले तरी लोकल अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ते कधी कमी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. उपनगरी रेल्वे सेवा सुधारण्याच्या घोषणा कशा पोकळ आहेत यावरच गुरुवारच्या ‘लोकल घसरणी’ने शिक्कामोर्तब केले आहे. मध्य रेल्वेच्या कारभाराचा तमाशा आणि लोकल वाहतुकीचा गोंधळ हा मागील पानावरून पुढे सुरू राहणार असाच त्याचा अर्थ. तो सहन करीत आला दिवस ढकलण्याशिवाय मुंबईकरांकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे?, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला हाणला आहे.