शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी डोंगर पिंजूनही सापडले नाहीत चोर

By admin | Updated: February 27, 2017 00:12 IST

मावळ तालुक्यात चोरांबाबतच्या उठणाऱ्या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

वडगाव मावळ : संपूर्ण मावळ तालुक्यात चोरांबाबतच्या उठणाऱ्या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या काल्पनिक चोरांना शोधण्याची मोहीम वडगाव पोलिसांनी राबविली. मात्र, चोर सापडले नाहीत.चोर या गावातून त्या गावात गेला. आता येथे होता. पत्र्यावरून उड्या मारून लगेच दुसऱ्या गावात गेला. अंगाला काळे आॅईल लावले आहे. खूप मोठी टोळी आहे. घरातील लोकांना प्रचंड मारहाण करतात. सोने चोरतात, पण कोणाला सापडत नाहीत किंवा आतापर्यंत कोणीही त्यांना पाहिले नाही अशा वावड्या उठत आहेत. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या काल्पनिक चोरांना शोधण्यासाठी वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काळे व त्यांच्या टीमने वडगाव परिसरातील मोहितेवाडी ते डोंगरवाडी असा संपूर्ण डोंगर पिंजून काढला.पण चोर सापडले नाहीत. त्यामुळे रात्री नऊपासून पहाटे सहापर्यंत शहरी व ग्रामीण भागात फिरणारे चोर दिवसा डोंगरात पण सापडले नाहीत, तर मग राहतात कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चोर आल्याच्या अफवांना ऊत येऊन त्या सर्वदूर पसरत आहेत. चोरी झाल्याचे किंवा या काळ्या आॅईलवाल्या चोराने चोरी केल्याचे कोठेही निष्पन्न झाले नाही. माझ्या घरात चोरी झाली, अशी साधी तक्रारदेखील कोणी नोंदवलेली नाही.(वार्ताहर)>मी आणि माझ्या टीमने मोहितेवाडी ते डोंगरवाडी असा संपूर्ण डोंगर पिंजून काढला. परंतु या ठिकाणी चोर असल्याचा कोणत्याही खाणाखुणा सापडल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यात चोरटे आहेत या केवळ अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये. काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील मजकुराची खात्री करावी. चोरट्यांविषयीचा खोटा मजकूर पसरवू नये. - प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक, वडगाव मावळ ठाणे.