शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी मारला पोलीस ठाण्यावर डल्ला

By admin | Updated: May 9, 2014 22:32 IST

उरण पोलिसांच्या आवारातील मुद्देमाल कक्षाचे कुलूप तोडून मुद्देमालाची ट्रंक फोडून त्यामधून २८ लाख ९२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली.

अजित पाटील, उरण : उरण पोलिसांच्या आवारातील मुद्देमाल कक्षाचे कुलूप तोडून मुद्देमालाची ट्रंक फोडून त्यामधून २८ लाख ९२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. एनएडीच्या कामगारांनी केलेल्या अपहाराची घटना काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली होती. त्याच्या व त्याच्या साथीदारांकडून पोलिसांनी सुमारे ३३ लाखांची रक्कम वसूल करून आपल्या मुद्देमाल कक्षात ठेवली होती. मात्र या रकमेवरच चोरांनी डल्ला मारला. बुधवारच्या रात्री १२ नंतर ते गुरुवारच्या दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडलेल्या या प्रकाराने उरण पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर न्हावाशेवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे हे उरण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेतउरण पोलीस ठाण्याच्या आवारातच असलेल्या चाळीमध्ये पोलिसांचा मुद्देमाल कक्ष आहे. या कक्षात विविध गुन्‘ांमधील रोख रकमा आणि दागिने ठेवण्यात आले होते. यापैकी तीन पाकिटांत ठेवलेल्या १२, १० आणि २० हजार या रकमेसह एनएडीच्या कामगाराने केलेल्या फसवणुकीच्या गुन्‘ातील २८ लाख ५०,००० अशी एकूण २८ लाख ९२ हजारांची रोकड चोरट्याने चोरून नेले. मुद्देमाल कक्ष पोलीस ठाण्याच्या आवारात असला तरीही गार्डचा माणूस हा आरोपींच्या सुरक्षेसाठी असतो. त्यामुळे मुद्देमाल कक्षासाठी वेगळा असा गार्ड देता आला नसल्याने चोरांचे फावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एनएडीच्या कामगाराने केलेल्या फसवणुकीच्या गुन्‘ातील ही रक्कम एनएडीच्या अधिकार्‍यांना सुपुर्द करण्याबाबतचा अर्ज उरण पोलीस ठाण्याने २८ एप्रिललाच उरण कोर्टाला सादर केला आहे. मात्र त्यावर कोणताही आदेश झाला नसल्याने ही रक्कम मुद्देमाल कक्षातल्या पेटीत ठेवण्यात आली होती. पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलिसांच्या ताब्यात असणार्‍या मुद्देमाल कक्षातून झालेल्या या चोरीचा कसून तपास करण्यात येत असून दोन दिवसांत या गुन्‘ाची उकल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे एसीपी शशिकांत बोराटे व पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास क्राइम विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. (वार्ताहर)