शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘सायन्स टॉपर’ बनला चोर

By admin | Updated: June 7, 2017 06:04 IST

गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली.

गौरी टेंबकर-कलगुटकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून त्याला २०१५-१६ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५०% गुण मिळाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून एमआयडीसी पोलीस त्याच्या मागावर होते.जयकिशन ओमप्रकाश सिंग अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी परिसरात कुटुंबासोबत राहतो. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. तो राहत असलेल्या परिसरातच त्याने काळ्या रंगाची होंडा कंपनीची टिष्ट्वस्टर ही मोटारसायकल चोरली. ती घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस ठाण्यात आणल्यावर सुरुवातीला गुन्हा कबूल न करणाऱ्या जयकिशनला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच पुरावे मिटविण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्हीदेखील फोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तीन महागड्या गाड्यांची चोरी केली आहे. गाडी चोरून ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून तो ‘ओएलएक्स’वर शेअर करायचा आणि ती विकायची   अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.>अन् बाईक ‘ओएलएक्स’वर सापडली !सहा महिन्यांपूर्वी जयकिशनने एमआयडीसी परिसरातून एक मोटरसायकल चोरी केली होती. तिची जाहिरात त्याने ‘ओएलएक्स’ वर दिली जी नेमकी त्याच मोटारसायकलच्या मालकाने पाहिली. त्यानुसार त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शाम आयरे यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण, सोनवणे, ब्रिजेश पवार, आतोळे आणि गवळी यांचे एक पथक तयार केले होते. ते जयकिशनच्या मागावर होते आणि अखेर सोमवारी रात्री या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.>व्यसनामुळे चोरी...अंधेरीच्या जीपीएम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आणि अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या जयकिशनला बारावीनंतर अमली पदार्थांची (बटन्स) सवय लागली. त्यामुळे गाड्या चोरण्यास त्याने सुरुवात केली. त्यातही पदवीच्या पहिल्या वर्षी तो वर्गात पहिला आला. मात्र द्वितीय वर्षात त्याला एका विषयात के.टी. लागली. तेव्हा पालक त्याला गावी घेऊन गेले आणि तेथे त्याचे लग्न लावून दिले. गावी काही महिने तो नीट वागला, मात्र मुंबईला पुन्हा के.टी.च्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आला आणि त्याने गाडी चोरण्याची योजना बनवली. मात्र या वेळी एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले.