शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

बडतर्फ कर्मचाऱ्यांना परत घेणार

By admin | Updated: March 18, 2016 02:44 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी दोन-चार दिवस गैरहजर राहिले तर बडतर्फ केले जातात. गेल्या सहा वर्षात सुमारे ४ हजार कर्मचारी अशाप्रकारे बडतर्फ झाले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी दोन-चार दिवस गैरहजर राहिले तर बडतर्फ केले जातात. गेल्या सहा वर्षात सुमारे ४ हजार कर्मचारी अशाप्रकारे बडतर्फ झाले आहेत. एवढी वर्षे सेवा दिल्यानंतर होणाऱ्या बडतर्फीमुळे कर्मचाऱ्याचे कुटुंब वाऱ्यावर येते. याची दखल घेत बडतर्फ कर्मचाऱ्यांना एक संधी दिली जाईल. ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व वैद्यकीयदृष्ट्या उत्तम असलेल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेतले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केली. रावते म्हणाले, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बस पोर्ट उभारले जातील. त्यासाठी आंतरराष्ट्रीय लवकरच निविदा निघतील. १२४ कोटी रुपये खर्च करून बस स्थानकांची दुरुस्ती केली जाईल. सुरक्षेसाठी २५० बसस स्थानकावर ७६२ नवीन सुरक्षा रक्षक नेमले जातील. ७० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आठ दिवसात अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल. उर्वरित पदे भरण्यासाठी महिनाभरात प्रक्रिया केली जाईल. एसटी महामंडळाची उपहारगृहे महिला बचत गटांना अल्पदरात दिली जातील. एड्सग्रस्तांनाही त्यांची ओळख समोर न येता कशी सवलत देता येईल, सिकलसेलग्रस्तांना मोफत प्रवासाची सवलत कशी देता येईल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अपघाती मृत्यूचे हजारो दावे प्रलंबित आहेत. प्रत्येक तिकीटावर सरसकट एक रुपया सेस लावून त्या रकमेतून १० लाख रुपये मोबदला दिला जाईल. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले. आॅटोरिक्षा परवाना १ लाख ४० हजार परवाने व्यपगत झाले होते. त्यातील ४३ हजार परवान्यांसाठी लॉटरी महाआॅनलाइन मार्फत काढली. त्यामध्ये एक लाख ६२ हजार अर्ज आले. ४० हजार अर्ज मराठी भाषिक होते. १ लाख २० हजार बिगर मराठी भाषिक होते. लॉटरीत ३५ टक्के मराठी आले. ७ हजार ४७७ जणांना मराठी येत नाही म्हणून परवाने प्रलंबित ठेवले. १९ हजार मराठी बांधवांना मिळाले. मराठी वाचता व लिहिता येणे ही कायद्यात तरतूद आहे. कागदपत्र पडताळणीसाठी मराठी भाषेची परीक्षा घेतली. अजून दोन लाख परवाने शहरांसाठी येत आहेत. त्यात ५२ टक्के आरक्षण दिले जाईल. या आरक्षणात ५ टक्के आरक्षण गिरणी कामगारांना व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील तसेच बेळगाव-कारवारच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. कर्मचाऱ्याच्या मुलीला २१ व्या वर्षी १ लाख १ एप्रिल २०१६ पासून एसटी कर्मचाऱ्याच्या घरी जन्मलेल्या मुलीच्या नावावर १७ हजार ५०० रुपये जमा केले जातील. २१ व्या वर्षी संबंधित मुलीला एक लाख रुपये मिळतील. एसटी कर्मचाऱ्यांना अटल पेन्शन योजना अनिवार्य करण्यात आली आहे. हप्ता पगारातून कापला जाईल, असेही रावते यांनी सांगितले. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बस पोर्ट उभारले जातील. त्यासाठी आंतरराष्ट्रीय लवकरच निविदा निघतील. ७० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आठ दिवसात अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल. उर्वरित पदे भरण्यासाठी महिनाभरात प्रक्रिया केली जाईल. एसटी महामंडळाची उपहारगृहे महिला बचत गटांना अल्पदरात दिली जातील. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री