शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये सापडलेले ते ‘आरडीएक्स’च

By admin | Updated: November 4, 2016 06:28 IST

राज्य दहशतवादविरोधी विभागाने (एटीएस) कारवाई करत जप्त केलेली स्फोटके, आरडीएक्स असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) केलेल्या चाचणीत उघड झाले

मुंबई : दिवाळीपूर्वी पालघरच्या सातवली गावात राज्य दहशतवादविरोधी विभागाने (एटीएस) कारवाई करत जप्त केलेली स्फोटके, आरडीएक्स असल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) केलेल्या चाचणीत उघड झाले आहे. याचा सविस्तर अहवाल येत्या आठवड्यात एटीएसला पाठविण्यात येणार असल्याची माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातवली गावामधील एका गोदामात स्फोटके दडवून ठेवण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, खुद्द एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मुंबई आणि ठाणे एटीएसच्या पथकांनी २७ आॅक्टोबरच्या रात्री संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात तब्बल १५ किलोंची स्फोटके जप्त केली होती. मात्र, याबाबत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास कमालीची गुप्तता पाळली होती.या प्रकरणी एटीएसने पाच जणांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. या स्फोटकांचे १६ नमुने तपासणीसाठी एफएसएलला पाठविण्यात आले होते. चाचणीमध्ये ते आरडीएक्स असल्याचे उघड झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)>बंदोबस्तात वाढमुंबईला लागून असलेल्या पालघर किनाऱ्यावरून ही स्फोटके आणण्यात आल्याचा संशय एटीएस अधिकाऱ्यांना असून, हा संवेदनशील परिसर असल्याने, समुद्रकिनाऱ्यांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तींसह अन्य अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनांवर नजर ठेऊन मुंबई किंवा आसपासच्या परिसरात अतिरेकी हल्ल्याची योजना होती का, याबाबत एटीएसचे अधिकारी कसून तपास करत आहेत.