शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ दारूच्या नशेत केले माकडांना ठार!

By admin | Updated: January 31, 2017 02:34 IST

आधी कोंडले अन् नंतर रॉडने केला हल्ला

अकोला, दि. ३0- तेल्हारा येथील विकृत मानसिकता असलेल्या तीन युवकांनी लोखंडी रॉडने हल्ला करीत दोन माकडांना ठार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणात सदर युवकांनी दारूच्या तर्र नशेत ठार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत तीन माकडे गंभीर जखमी झाले. तेल्हारा येथील रहिवासी संतोष माधव खारोडे, गजानन सावळे आणि संतोष किसन खारोडे या तिघांनी दारूचे यथेच्छ मद्य प्राशन केले. त्यानंतर या परिसरात आलेल्या माकडांना एका खोलीत कोंडून त्यांच्यावर तिघांनीही लोखंडी रॉडने हल्ला चढविला. तीनही आरोपींनी दारूच्या नशेत संगनमताने माकडांच्या डोक्यावर हल्ला चढविल्याने या हल्ल्यात दोन माकडांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोन ते तीन माकडे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वन विभागाच्या तक्रारीनंतर तेल्हारा पोलिसांनी सदर तीनही आरोपींविरुद्ध वन्य जीवाच्या शिकारीचा गुन्हा दाखल केला आहे. यामधील संतोष माधव खारोडे, गजानन सावळे हे दोन आरोपी पोलीस कोठडीत असून तिसरा आरोपी फरार आहे. दारूच्या नशेत या तिघांनी हे कांड घडविले असून हे प्रकरण वनविभागाने गांभीर्याने घेतले असून त्यांच्यावर कारवाईचा फास आवळण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे.तीन वर्षांंची शिक्षावन कायद्यामध्ये वन्य जीवांची शिकार केल्याप्रकरणी या तीनही आरोपींना तब्बल तीन वर्षांंची शिक्षा होण्याचे प्रावधान आहे. एवढेच नव्हे तर तीनही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. मद्यधुंद अवस्थेत केलेल्या या खुनामुळे तीनही आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे.तीनही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून वन विभाग आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहे. या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. माकडांचा खून करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा तसेच शिकार केल्याप्रकरणी त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.- अशोक वायाळवनपरिक्षेत्र अधिकारी