शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ देशात राहण्याचा अधिकार नाही

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून, भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र

नाशिक : भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून, भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या घोषणा देणाऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी उभे राहत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने शनिवारी गोदाकाठावर आयोजित संवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात फडणवीस यांनी, ‘भारत माता’ विरोधात घोषणा देणाऱ्यांना आडवे हात घेतले. भारतमाता की जय, वंदे मातरम या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, विरोधकांनी प्रसंगी भाजपाला विरोध करावा; परंतु भारत मातेला विरोध करू नये; ते देशातील जनता कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नाशिकच्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी सोडले त्यावेळी आमदार, खासदार यांनी आपल्याकडे येऊन तक्रार केली; परंतु राज्यातील एक भाग तहानलेला असताना त्यांना पाणी न देणे योग्य होणार नाही, अशी भूमिका आपण घेतली व मराठवाड्याला पाणी सोडले, असे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेला केले लक्ष्यस्वतंत्र मराठवाड्याच्या विषयावरून भाजपाच्या महिला मेळाव्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. ज्यांनी स्वतंत्र मराठवाड्याला विरोध केला, त्यांनीच मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध दर्शविला, एकीकडे संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करायची व दुसरीकडे मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करायचा ही कोणती नैतिकता आहे, असा सवाल करून मराठवाड्यातील जनता आपलीच आहे, ती पाकिस्तानी नाही त्यामुळे एकदा ठरवून टाका जे करायचे ते करा, मला विरोध घ्यावा लागला तरी घेईन व प्रसंगी नाशिककरांची माफी मागेन; परंतु मराठवाड्यासाठी घोटभर पाणी देईन, असे फडणवीस म्हणाले.