शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ते पोस्टर हटवलं, शिवसेनेचं घूमजाव

By admin | Updated: October 21, 2015 16:03 IST

बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होणा-या नेत्यांचे पोस्टर लावून भाजपावर वार करणा-या शिवसेनेने अचानक घूमजाव करत 'ते' वादग्रस्त पोस्टर हटवलं आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होणा-या भाजपाचे  पोस्टर लावून भाजपावर वार करणा-या शिवसेनेने अचानक घूमजाव करत 'ते' वादग्रस्त पोस्टर हटवलं आहे. पोस्टरमधून कार्यकर्त्यांची भावना व्यक्त झाली, पक्षाने पोस्टर लावण्याचे आदेश दिले नव्हते, कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता असे स्पष्टीकरण देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 
शिवसेनेने सेना भवनच्या परिसरात भाजपावर निशाणा साधणारे पोस्टर लावल्याने आज सकाळपासूनच वातावरण तापले होते. अटलबिहारी वाजपेयींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे बाळासाहेबांसोबतचे फोटो या पोस्टरवर लावण्यात आले होते.  जे भाजपा नेते एकेकाळी बाळासाहेबांसमोर नतमस्तक होत असत, तेच नेते आता मागील दिवस विसरले असल्याची टीका सेनेने पोस्टरद्वारे केली होती. शिवसेना आणि बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्रात भाजपाचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असली तरी राज्यात आपणच मोठा भाऊ आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्नही शिवसेनेने केला होता. मात्र सेनेच्या या कृतीमुळे राज्यातील वातावरण तापू लागले आणि भाजपातूनही शिवसेनेच्या कृत्याचा विरोध होऊ लागला. जो आदर आम्ही बाळासाहेबांना दाखवला तोच आदर आम्ही उद्धव व आदित्य ठाकरे यांना दाखवू असे सेनेला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. आगामी काळात कदाचित आदित्य ठाकरेच नरेंद्र मोदींसमोर नतमस्तक झालेले दिसतील असा टोला हाणत भाजपा नेते गिरीश व्यास यांनी शिवसेनेला इशार दिला होता. 
त्यानंतर शिवसेनेने घूमजाव करत ते पोस्टर हटवले आणि ही कृती पक्षाध्यक्षांच्या आदेशावरून झाली नसल्याचे स्पष्ट करत अप्रत्यक्षरित्या माफीनामाही सादर केल्याचे दिसत आहे.