शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ मूल वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करू शकत नाही - हायकोर्ट

By admin | Updated: June 11, 2017 01:33 IST

‘ते’ मूल वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करू शकत नाही - हायकोर्ट

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लिव्ह-इन-रिलेशनशिप व समलिंगी संबंधातून जन्माला आलेल्या मुलांनी कायदेपंडितांना ‘विवाहा’चा अर्थ लावण्याचे आव्हान दिले आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणेच वडिलांच्या संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले. मात्र अनैतिक संबंधातून जन्माला आलेले मूल वडिलोपार्जित संपत्तीवर आपला अधिकार सांगू शकत नाही, हे देखील उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे एका मुलीला तिच्या मरण पावलेल्या वडिलांची संपत्ती व सेवानिवृत्ती वेतनमधील काही हिस्सा मिळू शकतो.मूल नैतिक की अनैतिक संबंधांतून जन्माला आले आहे, याचा निर्णय घेण्यासाठी ‘विवाह’ ही महत्त्वाची अट आहे, असे न्या. मृदूला भाटकर यांनी अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीच्या अर्जावर निर्णय देताना म्हटले. मुलीच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून त्यांना मुलगी झाली.‘वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर दावा करण्याचा अधिकार अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला अजिबात नाही, यात शंकाच नाही. मात्र या मुलाला वडिलांच्या नैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाप्रमाणे वडिलांच्या संपत्तीवर व अन्य लाभांवर दावा करण्याचा अधिकार आहे. बेकायदा विवाहातून जन्माला आलेल्या मुलासंदर्भातील काही समााजिक विसंगती दूर करण्यासाठी कायदेमंडळाने प्रगतिशील पाऊल उचलले आहे,’ असे न्या. भाटकर यांनी म्हटले.विवाह एक समाजिक बंधन आहे तर मूल जन्माला येणे हे नैसर्गिक आहे. कधी आणि कसा जन्म घ्यायचा, हे माणसाच्या हातात नाही. त्यामुळे अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही. तेच मूल जर नैतिक संबंधातून जन्माला आले असते तर त्याला जे अधिकार मिळाले असते, ते त्याला द्यायला हवेत, असेही न्या. भाटकर म्हणाले.भारतात लिव्ह-इन-रिलेशीपमध्ये राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या नात्यालाही विवाहाप्रमाणे स्वीकारले जात आहे. ‘मातृत्व’ मान्य केले जाते व सिद्धही होते मात्र ज्या प्रकरणामध्ये कायदेशीर विवाह झाला नाही, त्यामध्ये ‘पितृत्व‘ सहजासहजी स्वीकारले जात नाही. ते सिद्ध करावे लागते. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचे वडील त्याच्या जबाबदारीतून हात झटकू शकत नाही. अशा मुलांच्या अधिकारांचे संरक्षण करायला हवे. परंतु, विवाह न करता झालेल्या मुलाला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता मिळत नाही, असे न्या भाटकर यांनी म्हटले.विवाहाची व्याख्या कायद्यात करण्यात आलेली नाही. त्यामुळे परंपरेनुसार किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच नात्याला‘विवाहा’ चे लेबल लावावे लागते. ‘एका रात्रीचे संबंध किंवा एखाद्या पुरुष आणि महिलेने संमतीने एकमेकांशी ठेवलेले शारिरीक संबंध म्हणजे विवाह नाही,’ असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले.इच्छा असली पाहिजे‘शारिरीक संबंध असणे, हे विवाहातील मुख्य बाब असली तरी ते म्हणजे सर्व नाही. त्यापेक्षा अधिक विवाहासाठी आवश्यक आहे. नात्याला ‘विवाहा’ चे नाव देण्यासाठी दोन्ही पक्षांना एकमेकांशी विवाह करण्याची आणि एकमेकांना ‘पती’ व ‘पत्नी’ चा दर्जा देण्याची इच्छा असली पाहिजे. याचे प्रकटीकरण काही पारंपारिक किंवा कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यावरच होते,’ असेही न्या. भाटकर यांनी म्हटले.