शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हे आहेत व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्स

By admin | Updated: November 16, 2016 18:25 IST

सध्या अनेक व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप उपलब्ध यापैकी काही महत्वाचे व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप विषयी आपण जाणून घेऊ.

अनिल भापकर

मुंबई, दि. १६ - मोठा गाजा वाजा करत मंगळवारी अखेर व्हॉट्सअ‍ॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग जगभर सर्वांसाठी सुरु झाले . येणार येणार म्हणून अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली. व्हॉट्सअ‍ॅपने बिटा व्हर्जन साठी व्हिडीओ कॉलिंग ची सुविधा चालू केली. मात्र व्हिडीओ कॉलिंगचा वापर करण्यासाठी एकच अट सध्या आहे ती म्हणजे तुम्ही ज्या व्हॉट्सअ‍ॅप युझर्सला व्हिडीओ कॉल करत आहेत त्याने सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केले असले पाहिजे तरच तुम्ही व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकता .मात्र व्हॉट्सअ‍ॅप हे काही व्हिडीओ कॉलिंगची सेवा देणारे एकमेव अ‍ॅप नाही .

कारण या अगोदर स्नॅपचॅट ,फेसबुक मेसेंजर ,व्हायबर ,हँगआउट,ड्युओ ,फेसटाईम तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे स्काईप आदी मेसेंजिंग अ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहे. मात्र टेक्नोसॅव्ही जगतात उत्सुकता होती ती म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग फीचर कधीपासून सुरु करतो .यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. अखेर तो दिवस उजाडला आणि मंगळवारी ही सेवा सुरु झाली .सध्या अनेक व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप उपलब्ध यापैकी काही महत्वाचे व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप विषयी आपण जाणून घेऊ.

ड्युओ :यावर्षी मे महिन्यात गुगलने अ‍ॅलो आणि ड्युओ अशा दोन अ‍ॅप स्मार्टफोन युझर्स साठी उपलब्ध करून दिल्या . यापैकी अ‍ॅलो हे मेसेंजर अ‍ॅप आहे तर ड्युओ हे खास व्हिडिओ कॉलिंग साठीचे अ‍ॅप आहे. ड्युओ वापरायला अत्यंत सोपे आहे . यामध्ये लिमिट मोबाइल डेटा हे ऑप्शन आहे ज्याचा वापर तुम्ही करू शकता . म्हणजे तुमचा मोबाइल डेटा एका लिमिट पर्यंतच खर्च करायचा हे तुम्ही ठरवू शकता . शिवाय नॉक नॉक हे फिचर सुद्धा यामध्ये आहे. तसेच नको असलेल्या लोकांना ब्लॉक करण्याची सुविधा सुद्धा ड्युओ मध्ये आहे. ड्युओ चे अजून एक महत्वाचे फिचर म्हणजे कॉल चालू असताना तुम्ही वाय-फाय किंवा मोबाईल डेटा यामध्ये स्विच करू शकता ते सुद्धा कॉल ड्रॉप न होता . एकूणच काय तर वापरायला सोपे आणि हवे तेवढेच फिचर घेऊन ड्युओ सेवा देत आहे.

फेसटाईम :फेसटाईम हे सुद्धा व्हिडिओ कॉलिंग सेवा देणारे अजून एक चांगले अ‍ॅप आहे. यामध्ये सर्वात चांगले फिचर म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉल करता तेव्हा समोरच्या कडे फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन नसला तरी चालतो तुम्ही त्या सोबत फक्त ऑडिओ कॉल करू शकता . फेसटाईम ची ऑडिओ कॉलिटी फार चांगली आहे. फेसटाईम चे लिमिटेशन म्हणजे हे फक्त अँपल युझर्स साठीच उपलब्ध आहे.

स्काईप :व्हिडिओ कॉलिंग मध्ये सर्वात मोठा प्लेअर म्हणजे स्काईप एवढी मोठी ओळख स्काईपची आहे. स्काईप हे सगळ्या प्लॅटफॉर्म वर काम करते जसे कि विंडोज ,अँड्रॉइड ,आयओएस ,पीसी आदी. स्काईपमध्ये अनेक फिचर आहेत जसे कि ग्रुप व्हिडिओ कॉल्स ,फ्री व्हॉइस कॉल्स ,ग्रुप चॅट ,शेअर फोटो,व्हिडिओ ,इमोजी आदी अनेक फिचर यात आहे.

हँगआउट :व्हिडिओ कॉलिंग मधील अजून एक मोठे नाव म्हणजे गुगलचे हँगआउट. यामध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग सोबतच अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. जसे कि ग्रुप चॅट , ग्रुप व्हिडिओ कॉलिंग ,फोटो ,व्हिडिओ ,स्टिकर ,ईमोजी आदी पाठविणे आदी सुविधा यामध्ये आहेत.

जस्टॉक :-जस्टॉक हे एक अजून फक्त व्हिडिओ कॉलिंग साठी असलेले अ‍ॅप आहे. यामध्ये वन टू वन व्हिडिओ कॉलिंग सोबतच ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. यामध्ये व्हिडिओ कॉलिंग चालू असताना फोटो शेअर करता येतात तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा सुद्धा यामध्ये आहे. जस्टॉक हे अँड्रॉइड आणि आयफोन दोघांना सुद्धा सपोर्ट करते. याशिवाय अजूनही अनेक फीचर्स यामध्ये उपलब्ध आहे