शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

म्हणून शिवसेनेचा पोपट बोलतोय - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 15, 2017 22:32 IST

उद्धव यांचा एक पोपट माझ्यावर आरोप करत आहे की, मी महापौर असताना नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार केला. पण त्या पोपटाने न्यायालयाचा अहवाल वाचला असता तर त्याने असा आरोप केला नसता

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 15 - उद्धव यांचा एक पोपट माझ्यावर आरोप करत आहे की, मी महापौर असताना नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार केला. पण त्या पोपटाने न्यायालयाचा अहवाल वाचला असता तर त्याने असा आरोप केला नसता, असे आमदार अनिल परब यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फटणीस यांनी टीका केली. आज दुपारी शिवसेना आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर नागपूर महानगरपालिकेत महापौर पदावर असताना भ्रष्ट्राचार केल्याचे आरोप केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. शिवसेनेकडून सौदेबाजी होते, असा गंभीर आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. पोपटाने किंवा साहेबांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईत तीन सभा झाल्या या सभेत त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त महापालिका झाली पाहिजे, ही तर जनतेची इच्छा तसेच आजच्या सभेतील गर्दी सांगते. मुंबईतील साकीनाका, घाटकोपर तसेच चिंचपोकळी येथे जाहिर सभा झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे - - काँग्रेस सरकारने त्याकाळी आम्हाला एका समितीच्या नावाखाली बदनाम करण्याचा कट रचला गेला-आम्ही उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयात आमची बाजू उचलून धरण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आमचे म्हणणे मान्य केले- सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून यांनी महापालिका चालवली. आम्हाला सामान्यांचा विकास करायचा आहे- नोटबंदीचा आणि महापालिकेचा काय संबंध? विकासकामाबाबत का बोलत नाही? लोकांना पाणी मिळत नाही, त्यावर का बोलत नाही-  नरेंद्र मोदीजी यांच्याविरोधात बोललेले जनतेला आवडत नाही, हे त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी लक्षात ठेवा- आम्ही 'करून दाखविले' असे सांगणारे नाही, तर करून दाखविणारे- काही लोकांना झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन नको आहे. आम्ही आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यास तयार आहोत- खंबाटाबाबत मराठी कामगाराची फसवणूक कुणी केली? २२ शाखाप्रमुखांना आणि कुणाच्या घरच्यांना खंबाटांकडून वेतन मिळते?- भ्रष्टाचाराबाबत मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा तेव्हा त्यावर गप्प का राहता? ७ वर्षाचे ऑडिट केव्हा देणार- जो काच के घर में रहते, वों दुसरे कें घर पे पत्थर नहीं फेका करते