शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आरोंदा जेटी होणार नाही

By admin | Updated: January 7, 2015 23:31 IST

नारायण राणे : ग्रामस्थांना सर्व कायदेशीर मदत करणार

सावंतवाडी/आरोंदा : माझा जन्म या जिल्ह्यात झाला आहे. यामुळे येथील लोकांचे ऋण फेडण्यासाठी माझे हे समाजकारण आहे. ज्या गावात पोट भरायला जातात, त्याच ग्रामस्थांना दगडांनी मारणे कितपण योग्य आहे? हे तुमचे सांडलेले रक्त मी कधी विसरणार नाही. पालकमंत्री नसलो, तरी तुमच्या मागे ठामपणे उभा राहीन. पण हे जेटीचे काम होऊ देणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आरोंदा येथे दिला. आरोंदा संघर्ष समितीच्यावतीने येथील भद्रकाली मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, सरपंच आत्माराम आचरेकर, पंचायत समिती सदस्या गौरी आरोंदेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर, सुदन बांदिवडेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संघर्ष समितीचे अविनाश शिरोडकर, गजानन तानावडे, जयप्रकाश चमणकर, संदीप नेमळेकर, सभापती प्रमोद सावंत, अशोक सावंत आदी यावेळी उपस्थित होते. आरोंद्यात लाठीमार होत होता, तेव्हा पालकमंत्री जहांगीर आर्टमध्ये उद्धव ठाकरे यांचे फोटो बघत होते. आम्ही आपल्या जनतेला सोडून असे काम केले नसते. अशी टीका त्यांनी केसरकर यांच्यावर केली. प्रास्ताविक संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर यांनी केले. ते म्हणाले, कावळ्याने गरूड होण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो गरूड होत नाही. आमच्यावर जो लाठीमार केला, त्यामागचा कर्ताकरविता आरोंदावासीयांनी ओळखला आहे, असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. यावेळी गजानन तानावडे, प्रकाश कवठणकर, गौरी आरोंदेकर, सत्येश खोब्रेकर आदींनी विचार मांडले. (प्रतिनिधी)जखमींना प्रत्येकी पाच लाखांची मदतकाँग्रेस नेते नारायण राणे यांनी आरोंद्यात झालेल्या दगडफेकीत तसेच पोलिसांच्या लाठीमारात जखमी झालेल्यांना पाच लाखाची मदत दिली. तसेच न्यायालयीन प्रक्रियेसाठीही लागेल तो खर्च देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गांधींच्या पक्षात असूनही 'गांधीगिरी' सांगणार नाहीकाँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले की, तुम्ही दगड खाल्लात, परंतु आमच्याकडे दगड नव्हते, असे सांगता, हे योग्य नाही. दगड मारणारे पुन्हा गावात येताना विचार करूनच आले पाहिजेत, अशी तयारी करा. मी जरी काँग्रेसमध्ये गांधींच्या पक्षात असलो, तरी गांधीगिरीच्या मार्गाने मार खा, असे कधीच सांगणार नाही. हे माझ्या नियमात बसत नाही, असे राणे यांनी यावेळी सांगताच आरोंदावासीयांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.