शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिक डॉक्टरांवर अन्याय होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST

‘कट प्रक्टिस’ हा वैद्यकीय क्षेत्राला लागलेला डाग असून, त्याची झळ थेट सामान्यांना बसते. त्यामुळे त्या विरोधात कायदा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरांवर अन्याय होणार नाही

जळगाव : ‘कट प्रक्टिस’ हा वैद्यकीय क्षेत्राला लागलेला डाग असून, त्याची झळ थेट सामान्यांना बसते. त्यामुळे त्या विरोधात कायदा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रामाणिक डॉक्टरांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे दिली.इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅम्सकॉन २०१७’ या अकॅडमी आॅफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या राज्यस्तरीय दोन दिवसीय परिषदेचे आयोजन येथे करण्यात आले आहे. शनिवारी त्याचे उद्घाटन झाले.महाजन यांच्यासह आयएमएचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, सचिव डॉ. पार्थिव संघवी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र आयएमएचे माजी उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील व डॉ. प्रताप जाधव यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.जळगावात मेडिकल हबवैद्यकीय खात्याचा मंत्री असल्याने आपण जळगावात मेडिकल हब आणले. येथे एकाच ठिकाणी सर्व पॅथींचा अभ्यासक्रम राहाणार असून, देशातील एकमेव मेडिकल हब जळगावात असेल, असे महाजन यांनी सांगितले. आपल्या मतदारसंघासह अनेक ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे, १०८ रुग्णवाहिकेचे चालक डॉक्टरांकडून टक्केवारी घेतात. हे स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी मान्य करीत, ही समस्या सोडवून त्यात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले.वैद्यकीय प्रवेशासाठी हुशार मुलांना प्रवेश मिळून संस्थाचालकांची मनमानी रोखण्यासाठी ‘नीट’ सारख्या परीक्षा घेतली जात असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवरील सदस्यांच्या निवडीची यादी सोमवार किंवा मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. डॉ. उल्हास पाटील यांनी डॉक्टर, हॉस्पिटलवरील हल्ले रोखण्यासाठी कडक कायदे करावे, अशी मागणी केली.